जळगावच्या वैष्णवी शिंपी हिने पटकावला “कॅलिस्टा इंडिया २०२६” मानाचा मुकुट
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , ११ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
चिंचवड: आपल्या उपजत सौंदर्याबरोबरच परीक्षकांनी विचारलेल्या मार्मिक प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तर देऊन आपले व्यक्तिमत्व सिद्ध करत जळगाव येथील वैष्णवी शिंपी हिने “कॅलिस्टा इंडिया २०२६” या बहुचर्चित सौंदर्य स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. रंगीबेरंगी प्रकाशझोतात आणि टाळ्यांच्या कडकडाटात वैष्णवीला आकर्षक मानाचा मुकुट आणि रोख २० हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
कॅलिस्टा पेजंट्स आयोजित “कॅलिस्टा इंडिया २०२६” आणि “कॅलिस्टा मिस, मिसेस महाराष्ट्र २०२६” या स्पर्धांची अंतिम फेरी चिंचवड येथील एल्प्रो सिटी मॉलमध्ये पार पडली. यावेळी देशभरातून आलेल्या ३३ सौंदर्यवतींनी आपले कलागुण सादर केले.
विजेत्या सौंदर्यवतींची नामावली:
प्रथम क्रमांक (विजेती): वैष्णवी शिंपी (जळगाव) – मुकुट व २०,००० रुपये.
प्रथम उपविजेती: काजल सोनकर (पश्चिम बंगाल) – मुकुट व १७,००० रुपये.
द्वितीय उपविजेती (विभागून): जागृती गाणवे (रायगड) आणि वृषाली अजोटीकर (पुणे) – मुकुट व १५,००० रुपये.
ऑनलाईन कॅलिस्टा इंडिया विजेत्या: डॉ. स्नेहल नारखेडे पोल, प्रियांका झाडे आणि अनिता महापुरे.
ऑनलाईन कॅलिस्टा महाराष्ट्र विजेत्या: अंजना गावले आणि डॉ. सुषमा सोनवणे.
उत्तेजनार्थ: शुभांगी मंगरुळकर, पूजा बनोडकर आणि प्राची राय.
या सोहळ्याला कॅलिस्टा पेजंट्सचे कार्यकारी संचालक संजीव जोग, आधार पशुपक्षी मित्र फाउंडेशनच्या अनिता अग्रवाल, मायफिल्म प्रॉडक्शनचे मयूर सोनवणे, करिश्मा सुर्ती यांच्यासह परीक्षक दीपाली मुंधारे, ज्योती कामत, सोनल परब, डॉ. भवानी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला आयोजकांच्या वतीने सोनेरी नथ, पैठणी साडी आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात ग्लॅमर आणि फॅशन विश्वाला समर्पित विशेष स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. वेशभूषेसाठी विशाखा लोहार, पूनम होंकळसे, ओंकार पवार तर मेकअपसाठी प्रियांका चौधरी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सारिका, प्रतिभा डोलणारे आणि नितीन साळुंखे यांनी काम पाहिले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
