news
पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्रकरणातील पीडितांना ‘अण्णासाहेब बनसोडे युवा मंचा’चा भक्कम आधार; विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे यांनी फुंकरले दुःख!नगरसेवक श्री. बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन यांच्या पाठपुराव्याला यश; गजानन नगर व ABC कॉलनीतील वीज समस्या सुटली!चऱ्होली बुद्रुक येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला पालकांचा उदंड प्रतिसाद; २५० हून अधिक बालकांना सुरक्षा कवच!अमरावतीत राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर; ‘अंनिस’ शहर शाखेच्या अध्यक्षपदी मिलिंद तायडे!शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर कडून अमरावती विभागात शाळांचा आढावा; शिल्लक निधीतून अभ्यासिका व संगणक सुविधा उभारण्याचे निर्देश!
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून स्मारक समितीला १ कोटींचे पाठबळ! महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून स्मारक समितीला १ कोटींचे पाठबळ! महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा होणार अधिक सक्षम; निगडीतील स्मारकातील शैक्षणिक सुविधांचा विस्तार होणार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून १ कोटी रुपयांच्या अनुदानाचा धनादेश प्रदान

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १२ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या “यशवंतराव चव्हाण स्मारक समिती”ला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १ कोटी रुपयांच्या अनुदानाचा धनादेश आज प्रदान करण्यात आला. महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते हा धनादेश समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या औद्योगिक आणि सहकारी धोरणाद्वारे आधुनिक महाराष्ट्राची भक्कम पायाभरणी केली. त्यांच्याच दूरदृष्टीमुळे पिंपरी-चिंचवडसारखी गावे आज देशातील अग्रगण्य औद्योगिक शहरांमध्ये रूपांतरित झाली आहेत. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणाऱ्या स्मारक समितीला महापालिकेने हे विशेष अनुदान दिले आहे.

निगडी प्राधिकरण परिसरातील भव्य स्मारकात संस्थेच्या वतीने अनेक स्तुत्य उपक्रम राबविले जातात. यामध्ये प्रामुख्याने ग्रंथालय, वाचनालय आणि सुसज्ज अभ्यासिका, सांस्कृतिक भवन आणि विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र, वैद्यकीय केंद्र आणि विविध सामाजिक उपक्रम या सुविधांचा लाभ दररोज हजारो विद्यार्थी, नागरिक आणि अभ्यासक घेत आहेत.

यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले की, “स्व. यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा ही महाराष्ट्राच्या विकासाची प्रेरणाशक्ती आहे. शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थांना महापालिका नेहमीच पाठबळ देईल. हे अनुदान म्हणजे समाज घडविणाऱ्या कार्याला दिलेला सन्मान आहे.”

याप्रसंगी आमदार शंकर जगताप, उपमहापौर सौ. शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विधी समिती सदस्य कुशाग्र कदम उपस्थित होते. तसेच स्मारक समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष संजय ढेंबरे, उपाध्यक्ष अमोल भोईटे, सचिव रामभाऊ तावरे, खजिनदार विलास भोसले, सहखजिनदार अशोक चव्हाण आणि रामचंद्र सकुंडे उपस्थित होते.

या अनुदानामुळे संस्थेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना अधिक गती मिळणार असून, नागरिकाभिमुख कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यास बळ प्राप्त होणार आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!