news
पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्रकरणातील पीडितांना ‘अण्णासाहेब बनसोडे युवा मंचा’चा भक्कम आधार; विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे यांनी फुंकरले दुःख!नगरसेवक श्री. बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन यांच्या पाठपुराव्याला यश; गजानन नगर व ABC कॉलनीतील वीज समस्या सुटली!चऱ्होली बुद्रुक येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला पालकांचा उदंड प्रतिसाद; २५० हून अधिक बालकांना सुरक्षा कवच!अमरावतीत राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर; ‘अंनिस’ शहर शाखेच्या अध्यक्षपदी मिलिंद तायडे!शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर कडून अमरावती विभागात शाळांचा आढावा; शिल्लक निधीतून अभ्यासिका व संगणक सुविधा उभारण्याचे निर्देश!
Home पुणे पुणे विद्यापीठाचा ‘दणका’! शिक्षक माहिती देण्यात कसूर करणाऱ्या महाविद्यालयांचे प्रवेश रोखणार

पुणे विद्यापीठाचा ‘दणका’! शिक्षक माहिती देण्यात कसूर करणाऱ्या महाविद्यालयांचे प्रवेश रोखणार

१८ मे ही माहिती अपलोड करण्याची अंतिम संधी; अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे अनेक संस्थांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महाविद्यालयांना अल्टिमेटम; १८ मे पर्यंत शिक्षकांची माहिती न दिल्यास प्रवेश प्रक्रियेवर बंदी

पुणे/पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, १२ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (SPPU) संलग्न असलेल्या ज्या महाविद्यालयांनी आणि मान्यताप्राप्त संस्थांनी अद्याप आपल्या पात्र शिक्षकांची माहिती विद्यापीठाच्या ‘बीओडी’ (BOD) पोर्टलवर अपलोड केलेली नाही, त्यांना विद्यापीठाने कठोर इशारा दिला आहे. येत्या १८ मे २०२६ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास, संबंधित महाविद्यालयांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष प्रवेशावर बंदी घातली जाईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

विद्यापीठाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, ही शेवटची संधी असून यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.

विद्यापीठाच्या नियमानुसार, प्रत्येक महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि राज्य सरकारने विहित केलेल्या किमान शिक्षक संख्येच्या किमान ५० टक्के शिक्षक असणे अनिवार्य आहे. यामध्ये ३१ मार्च २०२६ पर्यंत विद्यापीठाच्या मान्यतेने नियुक्त केलेले नियमित आणि तदर्थ (Ad-hoc) शिक्षकांचा समावेश करण्यात येईल.

यापूर्वी विद्यापीठाने शिक्षक भरती आणि माहिती अपलोड करण्यासाठी ३१ मार्च ही मुदत दिली होती. त्यानंतर १५ एप्रिल आणि ९ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, तरीही अनेक महाविद्यालयांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाच्या विद्या परिषदेने (Academic Council) २४ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीत, निकष पूर्ण न करणाऱ्या संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.

१८ मे ही माहिती अपलोड करण्याची अंतिम तारीख असेल. जे महाविद्यालय या मुदतीत माहिती देणार नाहीत, ते नियम पाळण्यास इच्छुक नसल्याचे गृहीत धरले जाईल. अशा महाविद्यालयांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रथम वर्षाचे प्रवेश घेता येणार नाहीत. या गंभीर निर्णयामुळे आता महाविद्यालयांमध्ये शिक्षकांच्या माहितीसाठी धावपळ सुरू झाली आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!