अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे यांची नियुक्ती
अमरावती प्रतिनिधी विलास सावळे, १३ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: सामान्य प्रशासन विभागाच्या ३० एप्रिल २०२६ च्या अधिसूचनेनुसार, अरुण किशोर डोंगरे यांची अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी श्री. डोंगरे यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
मुंबई येथील नवीन प्रशासन भवनातील महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या कार्यालयात हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी माजी आयुक्त दिलीप शिंदे यांनी नियुक्तीची अधिकृत अधिसूचना वाचून दाखविली.
अमरावती विभागाच्या आयुक्तपदाची महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याबद्दल अरुण डोंगरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले.
या सोहळ्याला राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील ज्यामध्ये प्रामुख्याने विधानसभा सदस्य करण देवतळे, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे, कोकण विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंह, पुणे विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त सुधाकर तेलंग अनेक मान्यवर उपस्थित होते,
या नियुक्तीमुळे अमरावती विभागातील सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

