news
पुण्यात वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी घटना! दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भूल देताच ६ वर्षांच्या चिमुरडीचा अंत, नातेवाईकांचा गोंधळअमरावती विभागाचा डंका! महाआवास अभियानात मिळवला महाराष्ट्रात दुसरा क्रमांक, ७ विविध श्रेणीत ८ पुरस्कारांवर कोरले नावपिंपरीत पालिकेचा बुलडोझर गरजला! जॉगर्स पार्क उद्यानाजवळील १५०० चौरस मीटरचे विस्तीर्ण अतिक्रमण जमीनदोस्तपिंपरी-चिंचवडला देशात नंबर वन बनवण्यासाठी सज्ज व्हा! ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ साठी ऑनलाईन फीडबॅक देण्याचे पालिका आयुक्तांचे आवाहनपिंपरीत ‘जनगणना २०२७’ चे बिगुल वाजले! घरयादी आणि घरगणनेच्या पहिल्या टप्प्याला प्रत्यक्ष सुरुवात
Home पुणे महाराष्ट्रासाठी मोठा बहुमान! पुण्याच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याकडे संसदेच्या अत्यंत महत्त्वपूर्ण समितीचे अध्यक्षपद

महाराष्ट्रासाठी मोठा बहुमान! पुण्याच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याकडे संसदेच्या अत्यंत महत्त्वपूर्ण समितीचे अध्यक्षपद

'विज्ञान-तंत्रज्ञान आणि पर्यावरण' स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती; 'संसदरत्न' डॉ. कुलकर्णी यांच्या अभ्यासू आणि प्रशासकीय अनुभवाला दिल्लीत मोठी संधी | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

पुणे/पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले, २० मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या आणि पुण्याच्या माजी आमदार तथा विद्यमान राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांची संसदेच्या अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने व हवामान बदल’ विषयक विभाग-संबंधित संसदीय स्थायी समितीच्या (Parliamentary Standing Committee) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार, कार्यसंचालन नियम २६९ अंतर्गत डॉ. कुलकर्णी यांची या समितीच्या अध्यक्ष व सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून राज्यसभेचे सभापती यांनी या नियुक्तीस अंतिम मान्यता दिली आहे.

राज्यसभा सचिवालयाचे संयुक्त सचिव राकेश नैथानी यांनी डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र त्यांना सुपूर्द केले. डॉ. कुलकर्णी यांची ही नियुक्ती १८ मे २०२६ पासून तातडीने प्रभावी झाली आहे.

विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्याधुनिक प्रगती, पर्यावरण संरक्षण, वनसंवर्धन आणि जागतिक स्तरावर चिंतेचा विषय बनलेल्या हवामान बदलाशी (Climate Change) संबंधित देशाची मुख्य धोरणे, नवीन विधेयके व विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांचा सखोल अभ्यास करण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशिल जबाबदारी या संसदीय स्थायी समितीकडे असते. या समितीच्या अध्यक्षपदी निवड होणे हा पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठा बहुमान मानला जात आहे.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ आणि अभ्यासू नेत्या आहेत. पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. सध्या त्या राज्यसभेत खासदार म्हणून कार्यरत असून, त्यांच्या संसदेतील उत्कृष्ट, अभ्यासपूर्ण आणि सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना याआधी अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘संसदरत्न’ पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे. त्यांच्या याच दांडग्या प्रशासकीय व वैचारिक अनुभवाची दखल घेत ही नवी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

या सर्वोच्च नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करत खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी पक्षनेतृत्वाची आणि सभापतींची आभारी आहे. या नियुक्तीमुळे देशातील वैज्ञानिक प्रगती, पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलासंदर्भातील धोरणात्मक चर्चेत थेट योगदान देण्याची मोठी संधी मला मिळणार आहे. आजच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानात झपाट्याने होणारी प्रगती आणि त्याला अनुसरून पर्यावरण संवर्धन राखणे हे मोठे आव्हान असून, या विषयांवर समितीच्या माध्यमातून सर्वसमावेशक काम करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.”

डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल महाराष्ट्रातील आणि पिंपरी चिंचवडमधील भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!