news
पुण्यात वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी घटना! दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भूल देताच ६ वर्षांच्या चिमुरडीचा अंत, नातेवाईकांचा गोंधळअमरावती विभागाचा डंका! महाआवास अभियानात मिळवला महाराष्ट्रात दुसरा क्रमांक, ७ विविध श्रेणीत ८ पुरस्कारांवर कोरले नावपिंपरीत पालिकेचा बुलडोझर गरजला! जॉगर्स पार्क उद्यानाजवळील १५०० चौरस मीटरचे विस्तीर्ण अतिक्रमण जमीनदोस्तपिंपरी-चिंचवडला देशात नंबर वन बनवण्यासाठी सज्ज व्हा! ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ साठी ऑनलाईन फीडबॅक देण्याचे पालिका आयुक्तांचे आवाहनपिंपरीत ‘जनगणना २०२७’ चे बिगुल वाजले! घरयादी आणि घरगणनेच्या पहिल्या टप्प्याला प्रत्यक्ष सुरुवात
Home पिंपरी चिंचवड पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड! देशाला हेवा वाटेल असे पहिले ‘LPG मुक्त शहर’ बनवण्यासाठी पालिकेचे पाऊल

पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड! देशाला हेवा वाटेल असे पहिले ‘LPG मुक्त शहर’ बनवण्यासाठी पालिकेचे पाऊल

घरगुती पाईप गॅसचा वापर वाढवण्यासाठी महापालिका, एमएनजीएल आणि गृहनिर्माण संस्थांची ऑटो क्लस्टरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडला देशातील पहिले ‘एलपीजी विरहित शहर’ बनवणार; नागरिक, सोसायट्या आणि एमएनजीएलने पुढाकार घेण्याचे आयुक्तांचे आवाहन

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २० मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “पिंपरी चिंचवड शहराला पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि आधुनिक इंधन व्यवस्थेकडे नेण्याचा महानगरपालिकेचा ठाम निर्धार आहे. देशातील अनेक प्रगत शहरांमध्ये घरगुती पाईप गॅस प्रणालीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच धर्तीवर पिंपरी चिंचवडमधील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीमध्ये पाईप गॅसचा वापर वाढविण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम राबविणे गरजेचे आहे. भविष्यात आपल्या शहराला देशातील पहिले ‘एलपीजी विरहित शहर’ बनविण्यासाठी गृहनिर्माण संस्था, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) तसेच नागरिकांनी संयुक्तपणे पुढाकार घ्यावा,” असे आवाहन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात घरगुती पाईप गॅसचा वापर वाढविणे, एलपीजी गॅस सिलिंडरवरील अवलंबित्व कमी करणे तसेच नागरिकांमध्ये सुरक्षित आणि पर्यावरणपूरक इंधनाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या वतीने विशेष संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी होते.

या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, उप आयुक्त अण्णा बोदडे, उपनिबंधक कार्यालयाचे सहाय्यक सहकार अधिकारी शशिकांत शृंगारे, बाळासाहेब घुगे उपस्थित होते.

तसेच महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे (MNGL) व्यवस्थापकीय संचालक शंकर कुमार, स्वतंत्र संचालिका भाग्यश्री मंथळकर, संचालक शंकर करजागी, महाव्यवस्थापक रितेश इंगोले, अमोल हाथी, वरिष्ठ संचालक वासुदेव गुरसाळी, प्रशांत खंदाडे, उपव्यवस्थापक अमोल वैद्य, सुनील पाटील, परम गोरे, संतोष बेना, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी प्रणव बी. यांच्यासह विविध गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष व प्रतिनिधी सुहास पटवर्धन, सचिन लोंढे, सचिन पाटील, संदीप कुंभार, संजिवन सांगळे, प्रताप भामरे, अधिक दिवे, चारूहास कुलकर्णी, सागर लोखंडे, राहुल मोकाशी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केंद्र शासनाने इंधन बचत आणि पर्यावरणपूरक ऊर्जेच्या वापराबाबत केलेल्या आवाहनाचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, शहरात एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करून घरगुती पाईप गॅसचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे. नैसर्गिक वायू हा सुरक्षित, अखंडित उपलब्ध होणारा आणि आधुनिक शहरी जीवनशैलीला पूरक असा सर्वोत्तम पर्याय आहे. गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष आणि सचिवांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त फ्लॅटधारकांना या पर्यावरणपूरक मोहिमेत सहभागी करून घ्यावे.

नागरिकांमध्ये पाईप गॅसबाबत विश्वास आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी आयुक्तांनी सोशल मीडिया मोहिमा, माहितीपत्रकांचे वितरण, प्रशिक्षण शिबिरे आणि थेट सोसायट्यांमध्ये जाऊन घरोघरी जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या.

विशेषतः ज्या गृहनिर्माण संस्थांमध्ये एमएनजीएलचे कनेक्शन (पाईपलाईन) उपलब्ध असूनही नागरिक प्रत्यक्ष वापर करत नाहीत, अशा सोसायट्यांना प्राधान्याने लक्ष्य करून विशेष मोहीम राबविण्याचे आदेश त्यांनी दिले. याशिवाय, नागरिकांच्या शंका, तांत्रिक अडचणी आणि नवीन कनेक्शन प्रक्रियेबाबत त्वरित मार्गदर्शनासाठी एमएनजीएलच्या वतीने तातडीने ‘समन्वय अधिकाऱ्याची’ नेमणूक करण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले.

या प्रणालीमुळे घरात सिलिंडर साठवणुकीची गरज राहत नाही, गॅस पुरवठा २४ तास अखंडित राहतो आणि वेळेचीही मोठी बचत होते. शहराच्या शाश्वत आणि ‘स्मार्ट सिटी’ विकासाच्या दृष्टीने पाईप गॅसचा वापर वाढविणे हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

बैठकीच्या उत्तरार्धात एमएनजीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे (PPT) गॅस पाईपलाईनची कार्यपद्धती, एमएनजीएल ॲपद्वारे उपलब्ध सेवा, आर्थिक बाबी, सुरक्षिततेचे कडक निकष आणि घरगुती पाईप गॅसच्या वापरामुळे ग्राहकांना होणारे थेट फायदे याबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!