news
पिंपरी मनपातील सुस्त कारभारावर महापौर रवी लांडगे यांचा हातोडा! कारवाईच्या भीतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये ‘व्हीआरएस’ची धास्तीचाकणनंतर आता थेरगावात अंमली पदार्थ विरोधी पथकाचा कडक प्रहार! ३.९ किलो गांज्यासह पिंपरीचा तस्कर जेरबंदचाकणमध्ये गुन्हे शाखेची मोठी रेड! हॉटेल वैष्णवीसमोर १२ लाखांच्या गांज्यासह तिघांना बेड्यावाकड, ताथवडे अन् पुनावळेकरांना दिलासा मिळणार; खराडी आयटी पार्क आणि स्वारगेटसाठी थेट PMPML बस सुरू करण्याची नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांची आग्रही मागणी!“पारंपरिक बलुतेदारांच्या हक्कांवर गदा आणू देणार नाही!” देवस्थान इनाम निर्मूलन आराखड्यावरून आमदार महेश लांडगे भोसरीत कडाडले
Home पिंपरी चिंचवड चाकणमध्ये गुन्हे शाखेची मोठी रेड! हॉटेल वैष्णवीसमोर १२ लाखांच्या गांज्यासह तिघांना बेड्या

चाकणमध्ये गुन्हे शाखेची मोठी रेड! हॉटेल वैष्णवीसमोर १२ लाखांच्या गांज्यासह तिघांना बेड्या

शिक्रापूर-चाकण हायवेवरील हॉटेल वैष्णवीसमोर गुन्हे शाखेची धडक कारवाई; अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आदेश © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चाकण परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाचा मोठा दणका! २३ किलो गांज्यासह तिघांना अटक, १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

शिक्रापूर-चाकण हायवेवरील हॉटेल वैष्णवीसमोर गुन्हे शाखेची धडक कारवाई; अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आदेश

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २९ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

चाकण: पिंपरी-चिंचवड शहराला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत आक्रमक मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण दक्षिण पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिक्रापूर-चाकण हायवेवर एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २३ किलो ५३८ ग्रॅम वजनाचा बेकायदेशीर ‘गांजा’ हा अंमली पदार्थ, ३ मोबाईल फोन आणि रोख रक्कमेसह एकूण १२ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या तस्करी प्रकरणी पोलिसांनी तीन अट्टल आरोपींना रंगेहात अटक केली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध अंमली पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखेला कडक आदेश दिले आहेत. या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त प्रदीप जाधव व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी शोध पथके तयार केली होती.

दि. २७ मे २०२६ रोजी दुपारी ३.२५ वाजेच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार निखिल वर्षे आणि विजय दौंडकर हे चाकण परिसरात गस्त (पेट्रोलिंग) घालत होते. यावेळी त्यांना चाकण दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेलपिंपळगाव (मोहितेवाडी, ता. खेड, जि. पुणे) येथील हॉटेल वैष्णवीसमोर, शिक्रापूर-चाकण हायवे लगत सार्वजनिक ठिकाणी तीन तरुण संशयास्पद रित्या उभे असलेले दिसले. पोलिसांनी तातडीने संशयावरून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर गांजा सापडला.पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत खालील तीन आरोपींना अटक केली आहे: १) संदीप भगवान हांडे (वय २८ वर्षे, रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे. मूळ रा. मु. पो. पिंपळखेड, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) २) गणेश सुरेश तारू (वय ३० वर्षे, रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे. मूळ रा. मु. पो. घोडगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) ३) रिहान वसीम शेख (वय १९ वर्षे, रा. खंडोबामाळ, चाकण, ता. खेड, जि. पुणे) अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून २३ किलो ५३८ ग्रॅम गांजा, गुन्ह्यात वापरलेले ३ मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण १२,१०,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) सुकाळे करत आहेत. ही धडक कामगिरी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) विक्रम गायकवाड, पोलीस हवालदार निखिल शेटे, विजय दौंडकर, पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे, गोविंद डोके, निखिल वर्षे, संतोष सपकाळ आणि चंद्रकांत जाधव यांच्या पथकाने ही विशेष कारवाई यशस्वी केली. तसेच या कारवाईच्या तांत्रिक विश्लेषणासाठी सहाय्यक पोलीस फौजदार नागेश माळी, पोलीस हवालदार प्रकाश ननावर आणि पोलीस शिपाई सुभाष गुरव यांनी मोलाची मदत केली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील सर्व सुजाण नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री, साठा किंवा वाहतूक होत असल्यास खालील क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल.

  • अंमली पदार्थ विरोधी पथक, पिंपरी चिंचवड: ८६००००२३२०
  • पोलीस राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक: ११२
  • केंद्रीय ‘मानस’ हेल्पलाईन क्रमांक: १९३३ (ईमेल: infoncbmanas@gov.in)

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!