news
Home अमरावती दर्यापुरात सेंट्रल बँकेचा कृषी क्षेत्राला मोठा दिलासा! भव्य कर्ज मेळाव्यात तब्बल १९ कोटींच्या निधीचे थेट वाटप

दर्यापुरात सेंट्रल बँकेचा कृषी क्षेत्राला मोठा दिलासा! भव्य कर्ज मेळाव्यात तब्बल १९ कोटींच्या निधीचे थेट वाटप

नाबार्डच्या जिल्हा व्यवस्थापक रश्मिता पंचाले यांच्या उपस्थितीत शेकडो शेतकऱ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप; देशात सर्वात कमी व्याजदराने कर्ज देण्याची प्रादेशिक प्रमुख सुनील पाण्डेय यांची ग्वाही | © २०२६मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दर्यापुरात सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा धमाका! मेगा कृषी मेळाव्यात १९ कोटी रुपयांचे कर्जवाटप

दर्यापूर (अमरावती) प्रतिनिधी अविनाश वानखेडे, ९ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

दर्यापूर (अमरावती): देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी दर्यापूर येथील सुप्रसिद्ध माहेश्वरी भवन येथे एका भव्य ‘मेगा कृषी ऋण (कर्ज) मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते. या विशेष मेळाव्यात शेतकऱ्यांना, कृषी उद्योजकांना आणि महिला बचत गटांना तब्बल १९ कोटी रुपयांच्या विविध कृषी कर्जांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले.

या महत्त्वपूर्ण मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नाबार्डच्या (NABARD) जिल्हा विकास व्यवस्थापक (DDM) रश्मिता पंचाले उपस्थित होत्या.

या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून नगर विकास विभागाचे सहआयुक्त डॉ. विकास खंडारे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक सचिन सुधाकर आणि बँकेचे प्रादेशिक प्रमुख सुनील पाण्डेय प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना क्षेत्रीय प्रमुख सुनील पाण्डेय म्हणाले, “सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशातील कृषी आणि ग्रामीण विकासासाठी अत्यंत प्रामाणिकपणे कार्यरत आहे. देशातील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी आणि नवनवीन कृषी पूरक उद्योगांना चालना देण्यासाठी बँक संपूर्ण देशभरात सर्वात कमी आणि किफायतशीर व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देत आहे. शेतकऱ्यांनी या विविध कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवावे.”

या मेळाव्यात सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अधिकारी विनय वैश यांनी बँकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजना, जसे की किसान क्रेडिट कार्ड (KCC), शेती यांत्रिकीकरण कर्ज, पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि शेतमाल साठवणूक केंद्र उभारणीसाठी मिळणाऱ्या सवलतींच्या कर्जांविषयी अत्यंत सविस्तर व अभ्यासपूर्ण माहिती दिली.

कार्यक्रमाचे अत्यंत नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन श्रीकांत पडवल यांनी केले. तर मेळाव्याच्या सांगतेप्रसंगी उपस्थितांचे आणि सर्व शेतकरी बांधवांचे मनःपूर्वक आभार अग्रणी जिल्हा व्यवस्थापक (LDM) नरेश हेडाऊ यांनी मानले.

या भव्य कृषी मेळाव्यामुळे दर्यापूर व परिसरातील शेकडो शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष कर्ज मंजुरीची पत्रे मिळाल्याने त्यांच्यामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!