news
Home पिंपरी चिंचवड भोसरीत नाभिक महामंडळाचा एल्गार; सलून व्यवसायात २०% दरवाढ मंजूर, दुकानांना ‘फाईव्ह स्टार’ दर्जा देण्याचे प्रदेशाध्यक्ष सयाजीराव झुंजार यांचे प्रतिपादन!

भोसरीत नाभिक महामंडळाचा एल्गार; सलून व्यवसायात २०% दरवाढ मंजूर, दुकानांना ‘फाईव्ह स्टार’ दर्जा देण्याचे प्रदेशाध्यक्ष सयाजीराव झुंजार यांचे प्रतिपादन!

नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न; वीर जिवाजी महाले आणि वीर शिवा काशीद यांच्या स्मारकांच्या सुशोभीकरणाची शासनाकडे मागणी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

“पारंपरिक चौकटीतून बाहेर पडून सलून क्षेत्रात ‘फाईव्ह स्टार’ सेवा देणे ही काळाची गरज!” – नाभिक महामंडळ प्रदेशाध्यक्ष सयाजीराव झुंजार यांचे आवाहन

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १८ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

भोसरी (पिंपरी-चिंचवड): “महाराष्ट्र नाभिक महामंडळ ही आपल्या संपूर्ण समाजाची मातृसंस्था आहे. कै. हनुमंतराव साळुंखे तात्या, ना. भु. संगमवार आणि वामनराव देसाई या थोर नेत्यांनी पारंपरिक गावगाड्यातील जोखडातून आणि अन्यायातून नाभिक समाजाला बाहेर काढण्यासाठी १९८१ मध्ये या संघटनेची स्थापना केली. आज आपल्या समाजाला आधुनिकतेची जोड देण्याची अत्यंत गरज आहे. नाभिक समाजाच्या तरुण पिढीने सुशिक्षित होऊन अत्याधुनिक सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायात उतरणे ही काळाची गरज बनली आहे. सलून ही आजच्या काळातील सर्वात मोठी ‘सर्व्हिस इंडस्ट्री’ (सेवा क्षेत्र) आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धती सोडून आपल्या दुकानांना ‘थ्री स्टार’ व ‘फाईव्ह स्टार’ दर्जा द्या; आज जग बदलत आहे, लोकांना चांगल्या सेवा हव्या आहेत आणि त्यासाठी ते योग्य पैसे देण्यासही तयार आहेत,” असे प्रखर आणि दिशादर्शक प्रतिपादन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजीराव झुंजार यांनी केले.

पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहर महामंडळाच्या संयुक्त वतीने भोसरी येथील गव्हाणे वस्ती येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘नाभिक समाज स्नेहमेळावा व नवीन पदाधिकारी पदग्रहण सोहळ्यात’ प्रमुख मार्गदर्शक म्हणून सयाजीराव झुंजार बोलत होते. याप्रसंगी त्यांनी समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकत, अन्याय आणि हक्काच्या विरोधात एकजुटीने शासनावर कायदेशीर दबाव निर्माण करण्याचे आवाहन केले.

 

आपल्या भाषणात सयाजीराव झुंजार यांनी ऐतिहासिक विषयांवर शासनाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत निष्ठावान मावळे, ज्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांचे प्राण वाचवून ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ हा इतिहास अजरामर केला, त्या वीर जिवाजी महाले यांचे प्रतापगडावरील स्मारक आणि पन्हाळगडाच्या पायथ्याशी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणारे वीर शिवा काशीद यांच्या स्मारकांचे अत्यंत भव्य सुशोभीकरण व संवर्धन तात्काळ शासनाने केले पाहिजे. ही दोन्ही ठिकाणे संपूर्ण इतिहासप्रेमींसाठी आणि आम्हा नाभिक समाज बांधवांसाठी निरंतर स्फूर्तीस्थाने आहेत.”

वाढती महागाई, दुकानांचे भाडे, अत्याधुनिक सुसाध्य साहित्य आणि कर्मचाऱ्यांचे वाढते वेतन लक्षात घेता, संपूर्ण पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सलून व्यवसायातील दरांमध्ये ‘२० टक्के दरवाढ’ करण्याचा अत्यंत महत्त्वाचा ठराव या मेळाव्यात सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नवीन दरवाढीची अंमलबजावणी लवकरच केली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सयाजीराव झुंजार यांच्या मान्यतेने खालील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. निलेश पांडे (पुणे जिल्हाध्यक्ष), गणेश वाळुंजकर (जिल्हा कार्याध्यक्ष), महेश सांगळे (पुणे शहराध्यक्ष), सागर आढाव (पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष), सचिन सूर्यवंशी (पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटक), सौ. स्नेहल राऊत (पिंपरी-चिंचवड महिला शहराध्यक्ष)

या ऐतिहासिक आणि मोठ्या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातून आणि गुजरात-सुरत प्रांतातून नाभिक समाजाचे दिग्गज नेते उपस्थित होते. प्रमुख अतिथी व ज्येष्ठ नेते: माजी प्रदेशाध्यक्ष दत्ताजी अनारसे (मुंबई), घनश्याम वाघ, विकास मदने, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष बाबासाहेब काशिद, बाळासाहेब तावरे, ज्येष्ठ कार्यकर्ते राजेश पाथरकर, संतोष फडतारे आणि मयूर रोकडे, पिंपरी-चिंचवड व तालुका अध्यक्ष: पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष हेमंत श्रीखंडे, गणपतराव क्षीरसागर (आंबेगाव तालुका), भाऊसाहेब क्षीरसागर (जुनूंर तालुका), नित्यानंद नेवकर, सुनील खंडागळे, संतोष गायकवाड (खेड तालुका), गोपीनाथ शेठ गायकवाड, गणेश साळुंके (दौंड तालुका अध्यक्ष), संतोष शेलार (मुळशी तालुका माजी अध्यक्ष), मारेकर साहेब (मुळशी तालुका अध्यक्ष), अमित कदम (मावळ तालुका), शशिकांत वाघ (भोर राजगड तालुका) आणि गणेश रायकर (शिरूर तालुका),   मारुती काटके (विभागाध्यक्ष, इंद्रायणी नगर), मयूर आढाव (दिघी), राहुल रसाळ (भोसरी), संदीप पंडित (भाजपा दिघी-बोपखेल गवळीनगर मंडल उपाध्यक्ष), संदीप दळवी (बोपखेल विभाग अध्यक्ष), संदीप महाले (चिंचवड वालेकरवाडी विभाग अध्यक्ष), अरविंद सैंदाणे (खानदेश मंडळाचे अध्यक्ष), रोहित सैंदाणे (गुजरात सुरत प्रांताचे अध्यक्ष), विठ्ठल पंडित (पिंपळे सौदागर विभाग अध्यक्ष), सुरेश मोरे (पिंपरी), नागेश कोकाटे (वाकड), आतिश जाधव, नाना सुरवसे आणि महादेव सुरवसे,  वधू-वर सूचक मंडळाचे माजी अध्यक्ष वसंत ढवळे, महादेव गंगाधर, महादेव मंडलिक, पिंपरी-चिंचवडचे माजी शहराध्यक्ष संतोष शिंदे, बाळासाहेब राऊत, पिंपरी-चिंचवड शहर सलून पार्लर अध्यक्ष मंगेज सुरवसे, नवनाथ आतकर, तुषार क्षीरसागर (चऱ्होली), गणेश गायकवाड, मनीष शिरनामे संत (मोशी चिखली), निंबा सोनवणे, उद्योजक अमित रसाळ, सेना महाराज मंदिर समितीचे अध्यक्ष कैलास रसाळ आणि संघटक सुशील रसाळ यांच्यासह पुणे जिल्ह्यातील शेकडो नाभिक समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सदर अत्यंत देखण्या मेळाव्याचे अतिशय नेटके व सुंदर सूत्रसंचालन रवींद्र फुलपाखरे यांनी केले, तर उपस्थितांचे मनःपूर्वक आभार नवनियुक्त पुणे शहराध्यक्ष महेश सांगळे यांनी मानले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!