news
पिंपरी-चिंचवड मनपा शाळांचा कायापालट; कासारवाडीत राजर्षी शाहू महाराज शाळेच्या हायटेक इमारतीचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण!NEET, TET आणि पुणे मनपा भरती पेपरफुटीवरून पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेस आक्रमक; हनुमंत पवार आणि नरेंद्र बनसोडे यांचा सरकारवर हल्लाबोल!पिंपरी-चिंचवडमध्ये पालखी स्वागतासाठी मनपा सज्ज; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला तयारीचा ऑन-द-स्पॉट आढावा!आकुर्डीत महावितरणविरोधात असंतोषाचा भडका; प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधात शिवनेरी सोसायटीचे रहिवासी आक्रमक!मनपा अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गणेश अवघडे; कष्टकरी संघर्ष महासंघाकडून भव्य सत्कार!
Home पिंपरी चिंचवड मनपा अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गणेश अवघडे; कष्टकरी संघर्ष महासंघाकडून भव्य सत्कार!

मनपा अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गणेश अवघडे; कष्टकरी संघर्ष महासंघाकडून भव्य सत्कार!

काशिनाथ नखाते यांनी सोपवली वैचारिक वारशाची जबाबदारी; यंदाची जयंती केवळ औपचारिकता न ठरता शोषितांच्या हक्कांचे मुख्य व्यासपीठ बनणार असल्याचा अवघडे यांचा निर्धार | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गणेश अवघडे यांचा ‘कष्टकरी संघर्ष महासंघा’कडून जंगी सत्कार; यंदाचे ‘जयंती प्रबोधन पर्व’ कष्टकऱ्यांच्या हक्कांचे व्यासपीठ ठरणार

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ३ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरी करण्यात येणाऱ्या ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती २०२६’ च्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते गणेश अवघडे यांची जाहीर निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने चिंचवड येथील मध्यवर्ती कार्यालयात गणेश अवघडे यांचा विशेष सत्कार करून त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी बोलताना कष्टकरी संघर्ष महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी गणेश अवघडे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नखाते म्हणाले, “साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या अजरामर साहित्यातून, धारदार शाहिरीतून आणि सामाजिक चळवळीतून नेहमीच कष्टकरी, कामगार, उपेक्षित, वंचित आणि शोषित समाजाला संघर्षाची मोठी प्रेरणा दिली. त्यांचा हा क्रांतिकारी वैचारिक वारसा पुढील पिढीपर्यंत अचूकपणे पोहोचवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. म्हणूनच, महापालिकेच्या वतीने होणारा हा जयंती उत्सव केवळ एक औपचारिक कार्यक्रम न राहता, ते समाजप्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम बनले पाहिजे.”

नखाते यांनी पुढे बोलताना आवाहन केले की, यंदाचे “जयंती प्रबोधन पर्व” हे कामगार, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांना न्याय देणारे असावे. सामाजिक समता, शिक्षण, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक न्यायाचा संदेश या माध्यमातून समाजात गेला पाहिजे, हीच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना खरी आदरांजली ठरेल.

कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त अध्यक्ष गणेश अवघडे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. ते म्हणाले, “उत्सव समितीचे सर्व सदस्य, मतदार, शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रमंडळींनी दिलेल्या खंबीर पाठबळावरच मला ही अत्यंत मानाची संधी प्राप्त झाली आहे. या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही. यंदाचा जयंती उत्सव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मूळ विचारांना खऱ्या अर्थाने न्याय देणारा असेल. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्यासोबतच, विशेषतः कामगार आणि कष्टकऱ्यांच्या हिताचे प्रश्न या मंचावरून अत्यंत प्रभावीपणे मांडले जातील,” असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

चिंचवड येथे पार पडलेल्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी शहरातील अनेक प्रमुख पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने नाना कसबे (माजी अध्यक्ष), सचिन नागणे (सामाजिक कार्यकर्ते), चंद्रकांत कुंभार (महासंघाचे सचिव), अविनाश बनसोडे, शामसुद्दीन शेख, अमोल गायकवाड, ओमप्रकाश मोरया 

या सर्वांनी गणेश अवघडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या पुढील नियोजनाला शुभेच्छा दिल्या.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!