news
शासनमान्य ग्रंथालयांना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानकडून अर्थसहाय्याची संधी; २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहनस्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘अजातशत्रू – अजितदादा’ पुस्तक मुखपृष्ठ अनावरण सोहळा संपन्नपिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनधिकृत होर्डिंग्सविरोधात ॲक्शन मोड; आकाशचिन्ह व परवाना विभागाचा थेट हातोडामोशी हत्याकांडावरून पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वपक्षीय एल्गार; पोलीस आयुक्तांना दिले तीव्र निदर्शनांचे निवेदनसांगवीत भाजप युवा सेना नेते जवाहरशेठ ढोरे यांचा नागरी सत्कार उत्साहात; सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांच्या हिताचा संकल्प
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनधिकृत होर्डिंग्सविरोधात ॲक्शन मोड; आकाशचिन्ह व परवाना विभागाचा थेट हातोडा

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनधिकृत होर्डिंग्सविरोधात ॲक्शन मोड; आकाशचिन्ह व परवाना विभागाचा थेट हातोडा

उपआयुक्त राजेश आगळे यांचा बेकायदेशीर जाहिरात फलक उभारणाऱ्या एजन्सींना कडक इशारा | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अनधिकृत जाहिरात फलकांवर पालिकेचा हातोडा! ताथवडेतील ४०×३० फुटांचे बेकायदेशीर होर्डिंग निष्कासित; महापालिकेचा एजन्सींना इशारा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २१ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी आणि महापालिकेचा महसूल बुडवणाऱ्या बेकायदेशीर होर्डिंग्सवर अंकुश ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा ‘आकाशचिन्ह व परवाना विभाग’ ॲक्शन मोडवर आला आहे. पालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे उभारण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांवर तातडीने निष्कासनाची (स्ट्रक्चर हटवण्याची) धडक मोहीम संपूर्ण शहरात सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत आज, दिनांक २१ जुलै २०२६ रोजी, पिंपरी-चिंचवड हद्दीतील जीवन नगर, मेरी गोल्ड हॉस्पीटलजवळ (ताथवडे, पुणे – ३३) येथे मे. अद्विक ॲडव्हर्टायझिंग यांनी पालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे ४०×३० फूट आकाराचा अवाढव्य जाहिरात फलक उभारल्याचे निदर्शनास आले.

या बेकायदेशीर होर्डिंगवर उपआयुक्त (परवाना) राजेश आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना निरीक्षक विनोद सरकानिया व त्यांच्या पथकाने तात्काळ धडक कारवाई केली. संपूर्ण लोखंडी स्ट्रक्चरसह (Iron Structure) हा अनधिकृत जाहिरात फलक कापून पूर्णपणे निष्कासित करण्यात आला.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील नियम २४४, २४५ तसेच महाराष्ट्र शासनाच्या ९ मे २०२२ च्या जाहिरात नियमन व नियंत्रण अधिनियमातील तरतुदींनुसार खाजगी जागेतही जाहिरात फलक उभारण्यापूर्वी महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.

देशभरात औद्योगिक आणि स्मार्ट सिटी म्हणून नावारूपाला येत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदेशीर होर्डिंग्समुळे शहराचे मोठे विद्रुपीकरण होत आहे. तसेच, पालिकेची परवानगी न घेतल्याने महापालिकेच्या महसुलातही मोठी घट होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील सर्व जाहिरात एजन्सी आणि व्यावसायिकांना प्रशासनाकडून कडक इशारा देण्यात आला आहे. शहरातील कोणत्याही भागात महापालिकेची रीतसर परवानगी न घेता अनधिकृत जाहिरात फलक उभारू नयेत. असे फलक आढळून आल्यास ते लोखंडी सांगड्यांसह तात्काळ निष्कासित केले जातील, याची सर्व एजन्सींनी गंभीर नोंद घ्यावी, असे आवाहन उपआयुक्त (परवाना) राजेश आगळे यांनी केले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!