news
शासनमान्य ग्रंथालयांना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानकडून अर्थसहाय्याची संधी; २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहनस्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘अजातशत्रू – अजितदादा’ पुस्तक मुखपृष्ठ अनावरण सोहळा संपन्नपिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनधिकृत होर्डिंग्सविरोधात ॲक्शन मोड; आकाशचिन्ह व परवाना विभागाचा थेट हातोडामोशी हत्याकांडावरून पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वपक्षीय एल्गार; पोलीस आयुक्तांना दिले तीव्र निदर्शनांचे निवेदनसांगवीत भाजप युवा सेना नेते जवाहरशेठ ढोरे यांचा नागरी सत्कार उत्साहात; सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांच्या हिताचा संकल्प
Home अमरावती शासनमान्य ग्रंथालयांना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानकडून अर्थसहाय्याची संधी; २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शासनमान्य ग्रंथालयांना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानकडून अर्थसहाय्याची संधी; २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

ऑनलाईन व चार प्रतीत ऑफलाईन अर्ज सादर करणे अनिवार्य; अमरावती जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचा उपक्रम | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या अर्थसहाय्य योजनेसाठी शासनमान्य ग्रंथालयांनी २१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन!

अमरावती/पिंपरी चिंचवड प्रतिनिधी जयकुमार चर्जन, २१ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ घेण्यासाठी सन २०२६-२७ या वर्षाकरिता राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. इच्छूक ग्रंथालयांनी आगामी २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले अधिकृत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन अमरावतीच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. अ. पुं. वानखडे यांनी केले आहे.

या उपक्रमांतर्गत सन २०२६-२७ साठी समान व असमान निधी योजनांच्या माध्यमातून ग्रंथालयांना मोठे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. समान निधी योजना (Matching Schemes)- इमारत बांधकाम व विस्तारासाठी अर्थसहाय्य: कमाल २५ लाख रुपये, असमान निधी योजना (Non-Matching Schemes)- स्वयंसेवी संस्थांना फर्निचर खरेदीसाठी: ४ लाख रुपये (प्रस्ताव फक्त एकदाच), इमारत बांधकामासाठी: १० ते १५ लाख रुपये, ‘ज्ञान कोपरा’ (Knowledge Corner) विकसित करण्यासाठी: २.५० लाख रुपये, आधुनिकीकरणासाठी विशेष अर्थसहाय्य: २ लाख रुपये, महोत्सवी वर्ष (ज्युबिली वर्ष) साजरे करण्यासाठी: ६.२० लाख रुपये, इमारत विस्तारासाठी: १० लाख रुपये, राष्ट्रीयस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण व जागरुकता उपक्रमांसाठी: १.५० लाख ते ३ लाख रुपये, ‘बालकोपरा’ (Children Corner) स्थापन करण्यासाठी: ६.८० लाख रुपये योजनेच्या अटी, शर्ती आणि अर्जाचा अधिकृत नमुना प्रतिष्ठानच्या rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इच्छुक ग्रंथालयांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्जाचा मसुदा इंग्रजी किंवा हिंदी भाषेत चार प्रतीत (4 copies) संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. याशिवाय, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या ऑनलाइन प्रणालीद्वारेही (Online Portal) अर्ज पाठवणे अनिवार्य आहे.

अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!