news
Home पिंपरी चिंचवड विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या शालेय वाहतूकदारांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचा मोठा चाबूक

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या शालेय वाहतूकदारांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचा मोठा चाबूक

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे व उपआयुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ७ विभागांत धडक मोहीम; नियम न पाळल्यास कडक कारवाईचा इशारा | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शाळकरी मुलांची धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर RTO अन् पिंपरी-चिंचवड पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक! ६९ वाहनांवर कारवाई, ३.७६ लाखांचा दंड वसूल

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २२ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील शाळा-कॉलेज सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांमधून नियमांचे उल्लंघन करून धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले होते. यावर आक्रमक पाऊल उचलत पिंपरी-चिंचवड पोलीस वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात धडक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत नियम मोडणाऱ्या ६९ वाहनांवर दंडात्मक कारवाई करत ३ लाख ७६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनल्याने पोलीस उपआयुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख यांनी पिंपरी-चिंचवड RTO कार्यालयाशी संपर्क साधून संयुक्त कारवाईसाठी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार RTO ची ‘वायुवेग पथके’ (Flying Squads) आणि पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या पथकांनी मिळून पिंपरी, वाकड, सांगवी, महाळुंगे, चिखली, तळवडे आणि हिंजवडी या ७ वाहतूक विभागांच्या हद्दीत चार दिवस ही विशेष तपासणी मोहीम राबवली.

तपशील संख्या / रक्कम
कारवाईचे दिवस (२९ व ३० जून, २ व २० जुलै) ०४ दिवस
एकूण तपासलेली वाहने (स्कुल बस, व्हॅन, ऑटो) १८१ वाहने
नियमभंग आढळलेली व कारवाई केलेली वाहने ६९ वाहने
वसूल करण्यात आलेला एकूण दंड ₹ ३,७६,९००/-

ही कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक-२) सत्यजित आदमणे तसेच वाहतूक विभागाचे सर्व प्रभारी अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी आणि वाहतूकदारांनी वाहतुकीच्या आणि सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे; अन्यथा यापुढेही अशीच कडक दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा वाहतूक शाखेकडून देण्यात आला आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!