news
दिल्ली मतदार यादी पुनरीक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; बाधित मतदारांची नावे आणि कारणे सार्वजनिक करण्याचे आवाहन!‘नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध’; स्थायी समिती बैठकीत सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!‘शिक्षकांमुळेच महापालिका शाळांकडे पालकांचा कल वाढला’; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान!‘शहराच्या नियोजनबद्ध विकासात पालिकेच्या अभियंत्यांचे योगदान अद्वितीय’; महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!‘अभिजात मराठी भाषा सप्ताह ही लोकचळवळ व्हावी’; पिंपरी महापालिकेच्या नियोजन बैठकीत महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!
Home मुख्यपृष्ठ NEET पेपरफुटी आंदोलन; पोलिसांच्या लाठीमाराविरोधातील तातडीची याचिका सर्वोच्च अन् दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

NEET पेपरफुटी आंदोलन; पोलिसांच्या लाठीमाराविरोधातील तातडीची याचिका सर्वोच्च अन् दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

'राजकीय प्रकरणांत न्यायालयाला ओढू नका'; ॲड. नरेन्द्र मिश्रा यांच्या पत्र-याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची कडक भूमिका | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाचा विद्यार्थी आंदोलनावरील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार; “आमचा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका” — सरन्यायाधीश सूर्यकांत

दिल्ली प्रतिनिधी, २३ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि विद्यार्थी संघटनांच्या वतीने दिल्लीत काढण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमाराविरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. “आमचा वेळ वाया घालवू नका आणि तुमचाही वेळ वाया घालवू नका,” अशा कडक शब्दांत भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्या वकिलांची मागणी फेटाळून लावली.

ॲडव्होकेट नरेन्द्र मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे पत्र-याचिका (Letter Petition) सादर करत यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती.

यावेळी बाजू मांडताना ॲड. मिश्रा म्हणाले की विद्यार्थी हे ‘नीट’ (NEET) परीक्षेचे पारदर्शक आयोजन आणि ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (NTA) मध्ये सुधारणांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि देशाच्या भविष्याशी जोडलेल्या मुद्द्यांवर आंदोलन करत आहेत. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठीमाराचे व अत्याचाराचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध आहेत.

यावर वकिलांचे बोलणे मध्यंतरीच थांबवत सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, “थँक्यू व्हेरी मच! आम्हाला कोणत्याही व्हिडिओमध्ये स्वारस्य नाही आणि ते पाहण्यासाठी आमच्याकडे वेळही नाही.” अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेपूर्वी, दिल्ली उच्च न्यायालयानेही याप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. “अशा राजकीय व आंदोलनाच्या प्रकरणात न्यायालयाला मध्यभागी ओढू नका,” असे स्पष्ट करत दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना झटका दिला होता. या संपूर्ण प्रकरणावर आज दिल्ली उच्च न्यायालयात नियमित प्रक्रियेनुसार सुनावणी पार पडत आहे.

NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीत एकीकडे राजकीय वातावरण तापलेले असताना, न्यायव्यवस्थेने या आंदोलनावरील पोलीस कारवाईच्या तातडीच्या सुनावणीपासून स्वतःला दूर ठेवल्याचे या निर्णयावरून दिसून येत आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!