news
Home पिंपरी चिंचवड सांगवी फाट्यावर महात्मा ज्योतिबा फुले पुलाखाली साकारला बहुउद्देशीय विरंगुळा प्रकल्प; रक्षक चौक सबवेचे भव्य लोकार्पण

सांगवी फाट्यावर महात्मा ज्योतिबा फुले पुलाखाली साकारला बहुउद्देशीय विरंगुळा प्रकल्प; रक्षक चौक सबवेचे भव्य लोकार्पण

आमदार शंकर जगताप, महापालिका अधिकारी व स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा उत्साहात पार | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

रक्षक चौकातील व्हेईक्युलर सबवे अन् सांगवी फाट्यावरील बहुउद्देशीय विरंगुळा प्रकल्पाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण! शहराच्या पायाभूत सुविधांत महत्त्वाची भर

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २४ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित व कोंडीमुक्त करण्यासोबतच नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध विकासकामे हाती घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगवी–किवळे रस्त्यावरील रक्षक चौक येथील नवनिर्मित व्हेईक्युलर सबवे (VUP) तसेच सांगवी फाटा येथील महात्मा ज्योतिबा फुले पुलाखालील बहुउद्देशीय विरंगुळा प्रकल्पाचे भव्य लोकार्पण आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

वाढत्या वाहनसंख्येमुळे रक्षक चौकात होणारी भीषण वाहतूक कोंडी लक्षात घेऊन महापालिकेने हा सबवे प्रकल्प उभारला आहे.  २२ कोटी ७७ लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम ६ सप्टेंबर २०२४ रोजी सुरू होऊन १० जुलै २०२६ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.२६.४० मीटर लांबीचा व ११.४० मीटर रुंदीचा मजबूत RCC बॉक्स सबवे उभारण्यात आला आहे. तसेच सांगवी फाटा व जगताप डेअरी चौकाच्या बाजूस रॅम्प आणि पादचाऱ्यांसाठी २.५० मीटर रुंदीचा स्वतंत्र पदपथ विकसित केला आहे.  या सबवेमुळे सांगवी–किवळे मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे सिग्नलविरहित (Signal-Free) आणि सुरळीत होऊन नागरिकांचा प्रवासाचा वेळ व इंधनाची बचत होणार आहे.

महात्मा ज्योतिबा फुले उड्डाणपूलाखालील मोकळ्या व पूर्वी दुर्लक्षित असलेल्या जागेचा प्रभावी वापर करत महापालिकेने तिथे ‘बहुउद्देशीय विरंगुळा प्रकल्प’ साकारला आहे. आकर्षक सुशोभीकरण, पादचारी मार्ग (Walking Track), बैठकीची व्यवस्था, खुली व्यायामशाळा आणि सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी प्रशस्त परिसर विकसित करण्यात आला आहे. यामुळे परिसराच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे.

या दोन्ही लोकार्पण सोहळ्यांना ‘ह’ प्रभाग अध्यक्षा तृप्ती कांबळे, ‘ज’ क्षेत्रीय अध्यक्षा आरती सुरेश चोंधे, शिक्षण समिती सभापती रविना आंघोळकर, नगरसदस्य ज्ञानेश्वर जगताप, शशिकांत कदम, शाम जगताप, नवनाथ जगताप, दिप्ती कांबळे, पल्लवी जगताप, ॲड. विनायक गायकवाड, संदीप कस्पटे, नगरसदस्या स्नेहा कलाटे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, शहर अभियंता मनोज सेठीथा, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता बापू गायकवाड, प्रेरणा शिनकर, कार्यकारी अभियंता सुनील पवार, संध्या वाघ, विजय भोजने, उपअभियंता चंद्रकांत मोरे, निलेश दाते तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन साठे, काळूराम बारणे, भुलेश्वर नांदगुडे, काळूराम नानगुडे, अनिल संचेती, प्रसाद कस्पटे, बाळासाहेब चोंधे यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकार्पणानंतर बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले:

“पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अशा दर्जेदार आणि दीर्घकालीन पायाभूत सुविधा उभारणे ही काळाची गरज आहे. शहरातील रस्ते वाहतूक कोंडीमुक्त व सुरक्षित करण्यासाठी महापालिका सातत्याने कार्यरत असून, भविष्यातही अशाच लोकहिताच्या व नागरिकाभिमुख प्रकल्पांना नेहमी प्राधान्य दिले जाईल.”

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!