news
गोडाऊन चौक ते वाकडदरम्यान धावणार रबर टायरींची ‘इलेक्ट्रिक बस मेट्रो’; २४० प्रवाशांची क्षमता अन् प्रदूषणमुक्त प्रवासनिवडणूक आयोगाच्या अभियानात १००% सहभागासाठी पिंपरी पालिका प्रशासनाचे कठोर पाऊल; अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोहोच सादर करणे अनिवार्य‘नीट’ गोंधळामुळे गमावला आत्मविश्वास; आमदार रोहित पवार यांच्याकडून अंकिता सांगळेला श्रद्धांजलीसार्वजनिक ग्रंथालयांच्या सक्षमीकरणासाठी केंद्राचा मोठा निधी; इमारत, ग्रंथ खरेदी अन् बालकोपऱ्यासाठी मिळणार मदतआमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश; जेएनएनयुआरएम व ईडब्ल्यूएस पुनर्वसन योजनांना मालमत्ता करात सवलतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार
Home मुंबई सार्वजनिक ग्रंथालयांच्या सक्षमीकरणासाठी केंद्राचा मोठा निधी; इमारत, ग्रंथ खरेदी अन् बालकोपऱ्यासाठी मिळणार मदत

सार्वजनिक ग्रंथालयांच्या सक्षमीकरणासाठी केंद्राचा मोठा निधी; इमारत, ग्रंथ खरेदी अन् बालकोपऱ्यासाठी मिळणार मदत

हिंदी किंवा इंग्रजीतून चार प्रतींत प्रस्ताव सादर करण्याचे गाडेकर यांचे निर्देश; ऑनलाइन प्रणालीद्वारेही नोंदणी अनिवार्य | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाणच्या अर्थसहाय्य योजनांसाठी अर्ज करण्याचे सार्वजनिक ग्रंथालयांना आवाहन; २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदत!

 

मुंबई/पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २७ जुलै २०२६

मुंबई: भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाण (कोलकाता) यांच्या समान (Matching) व असमान (Non-Matching) निधी योजनांतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. इच्छुक ग्रंथालयांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.

ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य (मुंबई) यांच्या माध्यमातून राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अर्थसहाय्य योजना राबविल्या जातात. या सर्व योजनांचे नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठाणाच्या अधिकृत www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

१. समान निधी (Matching) योजना:

इमारत बांधकाम व विस्तार: कमाल २५ लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध. (नोंद: या व्यतिरिक्त इतर समान निधी योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येणार असल्याने त्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करू नयेत.)

२. असमान निधी (Non-Matching) योजना –  ग्रंथ, साधनसामग्री व फर्निचर खरेदी: ४ लाख रुपये., इमारत बांधकाम (फक्त एकदाच): १० ते १५ लाख रुपये., ‘ज्ञान कोपरा’ विकास: २.५० लाख रुपये., विशेष आधुनिकीकरण: २ लाख रुपये., ‘बालकोपरा’ स्थापना: कमाल ६.८० लाख रुपये.
३. महोत्सवी वर्ष आणि विशेष उपक्रम – महोत्सवी वर्षे (५०, ६०, ७५, १००, १२५ व १५० वी वर्षे): कार्यक्रम आयोजनासाठी ६.२० लाख रुपये आणि इमारत विस्तारासाठी १० लाख रुपये., राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा व प्रशिक्षण वर्ग: १.५० लाख, २.५० लाख व ३ लाख रुपये अर्थसहाय्य.,

 इच्छुक ग्रंथालयांनी कोणत्याही एका योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी किंवा हिंदी भाषेत प्रस्ताव चार प्रतींमध्ये तयार करावेत.  हे प्रस्ताव संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत जमा करणे आणि राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाणाच्या ऑनलाइन प्रणालीद्वारेही सादर करणे अनिवार्य आहे.

अधिक माहितीसाठी ग्रंथालयांनी www.rrrlf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा आपल्या जिल्ह्याच्या ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!