news
‘शहर स्वच्छ ठेवणाऱ्या हातांची दिवाळी अंधारात ढकलू नका’; अमरावती महापालिका व कामगार विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी!‘संविधानाची ७३ वी घटनादुरुस्ती आणि ग्रामपंचायतीचे अधिकार’; अमरावती जिल्ह्यातील निंभोरा गावात यशस्वी कार्यशाळा संपन्न!‘अडीच हजार स्पर्धकांना मागे टाकत हेवन अकादमीच्या खेळाडूंचा राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक विजय’; शहरातून अभिनंदनाचा वर्षाव!‘कामगारांची दिवाळी अंधारात ठेवणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही, पालिकेतून कायमचे ब्लॅकलिस्ट करणार’; मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप!‘देशाची एकता आणि अखंडता जपण्याचा महापालिकेत दृढ संकल्प’; सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी सोहळा संपन्न!
Home अहिल्या नगर ‘नीट’ गोंधळामुळे गमावला आत्मविश्वास; आमदार रोहित पवार यांच्याकडून अंकिता सांगळेला श्रद्धांजली

‘नीट’ गोंधळामुळे गमावला आत्मविश्वास; आमदार रोहित पवार यांच्याकडून अंकिता सांगळेला श्रद्धांजली

कटऑफपेक्षा कमी गुण मिळाल्याने टोकाचे पाऊल; विद्यार्थ्यांनी खचून न जाण्याचे रोहित पवार यांचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

NEET च्या फेरपरीक्षेत गुण कमी मिळाल्याने १९ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिले – ‘मी एक सरासरी विद्यार्थिनी…’

 

अहिल्यानगर/कर्जत, प्रतिनिधी दि. २८ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अहिल्यानगर/कर्जत: NEET (नीट) च्या फेरपरीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याच्या निराशेतून अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील १९ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अंकिता सांगळे (वय १९) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता सांगळे ही ऑनलाईन कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून ‘नीट’ परीक्षेची तयारी करत होती. शनिवारी तिचे आई-वडील आणि मोठा भाऊ आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी अंकिता सांगळे घरी एकटीच होती. संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी घरात जाऊन पाहिले असता अंकिता सांगळे ही पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड (Hanuman Gaikwad) यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर घटनास्थळावरून एक सुसाईड नोट हस्तगत करण्यात आली आहे. यात अंकिता सांगळे हिने ‘नीट’ फेरपरीक्षेतील कमी गुणांमुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे लिहिले आहे. “मी एक सरासरी विद्यार्थिनी आहे, मी आई-वडील आणि भावाच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही,” असे सांगत अंकिता सांगळे हिने सुसाईड नोटमध्ये कुटुंबीयांची माफीही मागितली आहे. अंकिता सांगळे हिला नीट फेरपरीक्षेत १६६ गुण मिळाले होते, तर कटऑफ १७७ गुण होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी दिली.

या दुर्दैवी घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “दिल्लीत विद्यार्थ्यांचे आंदोलन यश मिळवत असतानाच ही अत्यंत दुःखाची बातमी समोर आली. ‘नीट’ गोंधळामुळे आत्मविश्वास गमावलेल्या जलालपूर येथील अंकिता सांगळे या विद्यार्थिनीने आयुष्य संपवले. आम्ही तिच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत,” अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी अंकिता सांगळे हिला श्रद्धांजली वाहिली. तसेच विद्यार्थ्यांना कोणत्याही अपयशाने खचून न जाता कुटुंबाचा विचार करण्याचे आणि संघर्ष चालू ठेवण्याचे आवाहनही आमदार रोहित पवार यांनी केले.

दरम्यान, याआधी २० जून रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील करंजी येथील २१ वर्षीय यश गोसावी (Yash Gosavi) या विद्यार्थ्यानेही नीट फेरपरीक्षेच्या आदल्या दिवशी आत्महत्या केली होती. पेपर लीक आणि फेरपरीक्षेच्या बातम्यांमुळे यश गोसावी मानसिक तणावाखाली होता. यश गोसावी याचा मोठा भाऊ अनिकेत (Aniket) हा दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाला होता. कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!