news
Home कोल्हापूर ईको कारच्या डिकीत महिलेचा मृतदेह ठेवून फिरणारा आरोपी भिवंडीतून अटक; दारूच्या नशेत लॉजवर सापडला

ईको कारच्या डिकीत महिलेचा मृतदेह ठेवून फिरणारा आरोपी भिवंडीतून अटक; दारूच्या नशेत लॉजवर सापडला

प्रकाश आनंदे पाटील याला कोल्हापूर पोलिसांच्या स्वाधीन केले; वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कडबाणे यांची माहिती | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

कोल्हापूरच्या तरुणीचा खून करून मृतदेह ईको कारच्या डिकीत लपवला; भिवंडीत संशयिताला पोलिसांनी ठोकल्या ठरड्या!

 

भिवंडी/कोल्हापूर, प्रतिनिधी दि. २९ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

भिवंडी/कोल्हापूर: गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरातून अचानक लापता झालेल्या ४० वर्षीय महिलेची गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात उभ्या असलेल्या एका कारच्या डिकीतून महिलेचा मृतदेह हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी कोल्हापूरच्या ४० वर्षीय आरोपीला भिवंडीतील एका हॉटेलमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सुरेखा शिवाजी आरे (वय ४०) असे मृत महिलेचे नाव असून, प्रकाश आनंदे पाटील (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील शिरगाव येथील रहिवासी असून एकमेकांच्या परिचयाचे होते.

नारपोली पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, कोल्हापूर पासिंग असलेली एक ‘मारुती सुझुकी ईको’ कार (Maruti Suzuki Eeco) भिवंडी परिसरात अत्यंत संशयास्पदरित्या उभी आहे. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून वाहनाची झाडाझडती घेतली असता, डिकीत सुरेखा आरे यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. प्राथमिक तपासात सुरेखा यांची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

वाहनाच्या माहितीवरून पोलिसांनी लागलीच परिसरातील लॉज आणि हॉटेल्सची तपासणी सुरू केली. जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये आरोपी प्रकाश पाटील हा त्याच्या पत्नीसह थांबलेला आढळला. पोलीस पथकाने छापा टाकला तेव्हा आरोपी प्रकाश हा दारूच्या नशेत धुत होता. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.

दरम्यान, आरोपीच्या पत्नीने चौकशीत सांगितले की, तिला प्रवासादरम्यान कारच्या डिकीत मृतदेह असल्याचे अजिबात ठाऊक नव्हते आणि प्रवासात काही संशयास्पद घडल्याचे तिच्या निदर्शनास आले नव्हते.

नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कडबाणे (Senior PI Vijay Kadbane) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा आरे यांच्या मिसिंगची (गहाळ) तक्रार कोल्हापूर पोलिसांत आधीच दाखल होती. त्यामुळे या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलीस भिवंडीत पोहोचले. न्यायालयातील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आरोपी प्रकाश पाटील याला कोल्हापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

या हत्येमागील नेमके कारण काय होते? जुना वाद की इतर काही आर्थिक अथवा वैयक्तिक कारण? याचा सखोल तपास आता कोल्हापूर पोलीस करत आहेत.

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!