27
चाकण-महाळुंगे औद्योगिक क्षेत्रातील प्रश्नांवर पोलिसांचे मोठे पाऊल; ‘इन्डस्ट्रिअल ग्रीव्हन्स सेल’ची स्थापना आणि हेल्पलाईन नंबर जाहीर!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड : चाकण आणि महाळुंगे एमआयडीसी परिसरातील उद्योग, उद्योजक, कामगार आणि माथाडी कामगारांचे गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी तसेच सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून आणि अध्यक्षतेखाली ‘दक्षिण महाळुंगे एमआयडीसी’ हद्दीतील मर्सिडीज-बेंझ कंपनीच्या प्रांगणात चारही एमआयडीसी पोलीस ठाण्यांतील (दक्षिण महाळुंगे, उत्तर महाळुंगे, चाकण दक्षिण व उत्तर चाकण) प्रमुख उद्योजक प्रतिनिधी आणि प्लांट हेड्सची विशेष समन्वय बैठक पार पडली.
या बैठकीत उद्योजक, पोलीस विभाग, एमआयडीसी, महावितरण (MSEB) आणि कामगार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र येत परिसरातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली.
एमआयडीसी क्षेत्रातील खंडणी, माथाडी प्रश्न, कामगार समस्या आणि इतर गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी गुन्हे शाखेअंतर्गत विशेष “Industrial Grievances Cell” स्थापन करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. उद्योजकांसाठी मदतीकरिता खालील विशेष हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत:
विशेष हेल्पलाईन नंबर: ७५१७७५१७९३ / ९०२९६३३४५२

पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले की, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हे उद्योजक आणि कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कोणत्याही गैरप्रकाराला थारा दिला जाणार नाही. पुणे-नाशिक, चाकण-तळेगाव आणि चाकण-शिक्रापूर महामार्गांवरील तीव्र वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ‘विशेष ट्रॅफिक प्लॅनिंग‘ (Special Traffic Planning) राबवणे. कंपन्यांमधील कामगार प्रश्न आणि उद्योजकांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला गती देणे. एमआयडीसी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची गस्त आणि कारवाई कडक करणे.
या बैठकीस पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता श्री. मोंडवे, सहाय्यक कामगार आयुक्त मुकुंद होणे, एमएसईबीचे केशव कालुमाळी, पोलीस उपायुक्त (परि-४) श्वेता खेडकर, पोलीस उपायुक्त (परि-३) मारुती जगताप, पोलीस उपायुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे, डॉ. सुदर्शन राठोड, गुलाब इनामदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ (दक्षिण महाळुंगे), दिगंबर सूर्यवंशी (उत्तर महाळुंगे), संजय सोळंके (चाकण दक्षिण), जितेंद्र कदम (चाकण उत्तर) आणि ५० ते ६० प्रमुख उद्योजक प्रतिनिधी उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

