news
दिल्ली मेट्रो, नाशिक कुंभमेळा जलसुविधा प्रकल्पासह ऊर्जा आणि सौर क्षेत्रातील मोठ्या ऑर्डर्स प्राप्त; कंपनीची व्यवसायात सातत्यपूर्ण घोडदौडशहराच्या पाणीपुरवठ्याला बाधा न आणता प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर संवेदनशीलतेने टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्याचे महापौरांचे आश्वासनपोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली मर्सिडीज कंपनीत उद्योजक व पोलीस विभागाचे भव्य समन्वय चर्चासत्रकृत्रिम फ्लेव्हर्सचा (Artificial Flavours) वापर ठरला कारण; अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याने अन्न सुरक्षा प्राधिकरणाची धडक कारवाईपत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा भाग दान करत वाचवला पतीचा जीव; तब्बल २१ लाख ६० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य
Home पिंपरी चिंचवड कृत्रिम फ्लेव्हर्सचा (Artificial Flavours) वापर ठरला कारण; अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याने अन्न सुरक्षा प्राधिकरणाची धडक कारवाई

कृत्रिम फ्लेव्हर्सचा (Artificial Flavours) वापर ठरला कारण; अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याने अन्न सुरक्षा प्राधिकरणाची धडक कारवाई

कृत्रिम फ्लेव्हर्सचा वापर भोवला; FSSAI कडून ओल्ड मंक, अँटीक्विटी अन् बॅगपायपर व्हिस्कीवर धडक कारवाई | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

FSSAI चा मोठा दणका! ओल्ड मंक, रॉयल चॅलेंजसह ‘या’ प्रसिद्ध दारूच्या ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड : भारतातील अन्न सुरक्षा नियामक संस्था ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने’ (FSSAI) मद्यप्रेमींमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या काही प्रमुख दारू ब्रँड्सच्या निवडक व्हेरियंट्सच्या (Variants) विक्रीवर बंदी घातली आहे. यामध्ये ओल्ड मंक (Old Monk), रॉयल चॅलेंज (Royal Challenge), अँटीक्विटी ब्लू (Antiquity Blue) आणि बॅगपायपर डिलक्स व्हिस्की (Bagpiper Deluxe Whisky) यांसारख्या प्रसिद्ध ब्रँड्सचा समावेश आहे.
या मद्य उत्पादनांमध्ये कृत्रिम फ्लेवरिंगचा (Artificial Flavouring) वापर करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले असून, हे एफएसएसएआयच्या (FSSAI) अन्न सुरक्षा मानकांचे थेट उल्लंघन ठरल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

अन्न आणि पेयांमध्ये फ्लेव्हर्सचा वापर सामान्य मानला जात असला तरी, व्हिस्की आणि रम तयार करण्याच्या पारंपरिक पद्धती व भारतीय अन्न सुरक्षा नियम यांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. नियम सांगतो की, व्हिस्की आणि रम यांसारख्या पेयांना विशिष्ट चव आणि सुगंध हा लाकडाच्या पिंपांमध्ये ठेवण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेतून (Ageing Process) आणि नैसर्गिक घटकांपासून मिळणे आवश्यक असते. FSSAI च्या तपासणीत या विशिष्ट व्हेरियंट्समध्ये नैसर्गिक चवीऐवजी मानकांना धरून नसलेले कृत्रिम फ्लेव्हर्स वापरले जात असल्याचे आढळून आले. नियमबाह्य आणि आरोग्यास हानिकारक असणाऱ्या अशा घटकांमुळे ग्राहकांची दिशाभूल थांबवण्यासाठी आणि गुणवत्तेचे पालन सक्तीचे करण्यासाठी प्राधिकरणाने या उत्पादनांच्या विक्रीवर बंदीचा निर्णय घेतला आहे.

देशातील अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या या ब्रँड्सवर FSSAI ने कारवाई केल्यामुळे मद्य निर्मिती उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे आता दारू उत्पादक कंपन्यांना आपल्या सर्व व्हरायटीजची गुणवत्ता तपासणे आणि मानकांनुसारच उत्पादन करणे बंधनकारक होणार आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!