news
सुगम बदली आणि शासकीय लाभ मिळवण्यासाठी बोगस दाखल्यांचा वापर; त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालानंतर मोठी कारवाईशिक्षण सुधारणा आणि बेरोजगारीला राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा संकल्प; मुख्य प्रवक्ते सौरव दास, प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यासह कोअर टीमच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयअभ्यागतांच्या तक्रारी व निवेदने प्रत्यक्ष ऐकून घेत स्थळपाहणी व तातडीने कार्यवाहीचे आदेश; दर गुरुवारी ४ ते ६ नागरिकांसाठी विशेष वेळ राखीवपक्षाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवणे आणि विरोधकांच्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्याला मोठी संधीदिल्ली मेट्रो, नाशिक कुंभमेळा जलसुविधा प्रकल्पासह ऊर्जा आणि सौर क्षेत्रातील मोठ्या ऑर्डर्स प्राप्त; कंपनीची व्यवसायात सातत्यपूर्ण घोडदौड
Home पिंपरी चिंचवड अभ्यागतांच्या तक्रारी व निवेदने प्रत्यक्ष ऐकून घेत स्थळपाहणी व तातडीने कार्यवाहीचे आदेश; दर गुरुवारी ४ ते ६ नागरिकांसाठी विशेष वेळ राखीव

अभ्यागतांच्या तक्रारी व निवेदने प्रत्यक्ष ऐकून घेत स्थळपाहणी व तातडीने कार्यवाहीचे आदेश; दर गुरुवारी ४ ते ६ नागरिकांसाठी विशेष वेळ राखीव

दर गुरुवारी सायंकाळी ४ ते ६ नागरिकांसाठी विशेष वेळ राखीव; पिंपरी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी ॲक्शन मोडमध्ये | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

नागरिकांच्या समस्यांचा तातडीने निपटारा करा; पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रशासनाला कडक निर्देश!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. ७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये अभ्यागतांकडून प्राप्त झालेल्या विविध निवेदने व तक्रारींची स्वतः प्रत्यक्ष दखल घेतली. नागरिकांच्या समस्या संवेदनशीलतेने ऐकून घेत, त्यांचा तातडीने आणि कालबद्ध निपटारा करण्यास प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे कडक निर्देश त्यांनी सर्व संबंधित विभागांना दिले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह-आयुक्त मनोज लोणकर, नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप-आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, डॉ. प्रदीप ठेंगल, कार्यकारी अभियंता संतोष दुर्गे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान शहरातील नागरिकांनी व अभ्यागतांनी अनधिकृत बांधकामे, रस्ते दुरुस्ती, अतिक्रमांचा प्रश्न, स्मशानभूमीतील सुविधा, क्रीडा सुविधा, शिक्षण, स्थापत्य विषयक कामे, आरोग्य व वैद्यकीय सुविधा, मालमत्ता कर आणि विविध नागरी विकासकामांशी निगडित तक्रारी थेट आयुक्तांसमोर मांडल्या.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्येक प्रकरण बारकाईने ऐकून घेत संबंधित विभागप्रमुखांकडून वस्तुस्थितीची माहिती जाणून घेतली. ज्या तक्रारींमध्ये अनेक विभागांच्या समन्वयाची गरज आहे, तिथे परस्पर सहकार्याने तातडीने तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

या प्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले:
“महापालिकेच्या संपूर्ण प्रशासनाचा केंद्रबिंदू हा सामान्य नागरिक आहे. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक तक्रारीकडे संवेदनशीलतेने पाहून तिचा कालबद्ध आणि प्रभावी निपटारा करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येक विभागाने उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून पिंपरी-चिंचवडकरांना दर्जेदार, पारदर्शक आणि तत्पर सेवा उपलब्ध करून दिलीच पाहिजे.”
नागरिकांच्या समस्यांच्या तातडीच्या निवारणासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दर गुरुवारी सायंकाळी ४ ते ६ ही वेळ अभ्यागतांना व नागरिकांना थेट भेटण्यासाठी निश्चित केली आहे. या वेळेत नागरिक आपल्या तक्रारी, सूचना आणि निवेदने थेट आयुक्तांकडे सोपवू शकतात. प्राप्त झालेल्या निवेदनांवर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून थेट घटनास्थळाची पाहणी व कार्यवाहीचे आदेश दिले जात आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!