32
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर; सांगवी विकास मंचच्या वतीने यथोचित गौरव!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. १७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाहीर झालेल्या पदकांमध्ये दापोडी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांना मानाचे ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे. याबद्दल सांगवी विकास मंच या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार व गौरव करण्यात आला.
कुंभार समाजातील एका अत्यंत सामान्य परिवारातून पुढे येत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांनी आपल्या प्रदीर्घ, पूर्णतः समर्पित आणि निष्कलंक सेवाकार्यातून हा सर्वोच्च सन्मान प्राप्त केला आहे. त्यांच्या या यशामुळे सांगवी व दापोडी परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सांगवी विकास मंचच्या वतीने आयोजित या सत्कार सोहळ्यात कुंभार साहेबांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक करण्यात आले असून, त्यांना त्यांच्या पुढील यशस्वी कार्यप्रवाहासाठी व वाटचालीस भावपूर्ण शुभेच्छा देण्यात आल्या.
या गौरव सोहळ्यास सांगवी विकास मंचचे अध्यक्ष महेशशेठ भागवत, ज्येष्ठ उद्योजक भरतशेठ कुंभार, ज्येष्ठ नागरिक संघ (सांगवी परिसर) चे भूतपूर्व अध्यक्ष अशोकराव भोसले, ज्येष्ठ साहित्यिक कवी मुरलीधरपंत दळवी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णकांत गिरगुणे, वायुदलातील निवृत्त अधिकारी आण्णासाहेब कुंभार, किर्लोस्कर कंपनीतील सेवानिवृत्त अधिकारी दत्तात्रय पवार, खादी ग्रामोद्योग समूहाचे माजी संचालक सुनील पोकरे, निवृत्त पोलीस अधिकारी लांडे, सामाजिक कार्यकर्ते राजन पिल्ले, संत नामदेव महाराज (सांगवी) ट्रस्टचे विश्वस्त अरुण खटावकर तसेच नारायण भागवत आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

