news
‘आईच्या हळव्या आठवणी अन् मिश्कील ओळींचा खळखळाट’; रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कवी वैभव जोशींचा ‘द मनमौजी’ बहरला!‘नागरी सुविधांची टोलवाटोलवी खपवून घेणार नाही’; पिंपरी महापालिकेत कब्रस्तानाच्या जागेवरून मुस्लिम बांधवांचा संताप!‘पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा’; पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पदक प्रदान!‘इंटिरिअर डिझायनिंग क्षेत्रात नव्या पिढीला संधींची कवाडे उघडी’; पीसीईटीच्या आकुर्डी संकुलात स्वागत सोहळा संपन्न!‘कोरोना काळातही अविरत सेवा देणाऱ्या टपाल कर्मचाऱ्यांचा गौरव करणे नैतिक जबाबदारी’; जागतिक टपाल दिनी निगडीत सोहळा!
Home पिंपरी चिंचवड ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान शहरात विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन; थेट पद्धतीने / कोटेशनद्वारे खर्च करण्यास मान्यता

९ ते १७ ऑगस्ट दरम्यान शहरात विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन; थेट पद्धतीने / कोटेशनद्वारे खर्च करण्यास मान्यता

पिंपरी-चिंचवड मनपाचा 'हर घर तिरंगा' मोहिमेसाठी २१ लाखांचा खर्च; देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी पिंपरी-चिंचवड पालिकेचा २१ लाखांचा खर्च; स्थायी समितीची मंजुरी!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १९ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड शहरात ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत विविध देशभक्तीपर आणि सांस्कृतिक उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी अपेक्षित असलेल्या ₹२१ लाख (+ GST) खर्चास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत मंजुरी देण्यात आली आहे.
नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या २७ जुलै २०२६ च्या पत्रानुसार सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून तात्काळ नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. उपक्रम अत्यंत वेळेत राबवायचा असल्याने या कामी येणारा खर्च कोटेशन अथवा थेट पद्धतीने करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा अपेक्षित खर्च तपशील:
अ.क्र. उपक्रम / कामाचा तपशील अंदाजे खर्च (₹)
१ शहरात सार्वजनिक ठिकाणी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ₹३,५०,०००/-
२ तिरंगा बाइक रॅली, सायकल रॅलीसाठी सेलिब्रिटी व मान्यवरांचे आमंत्रण ₹३,००,०००/-
३ विविध कार्यक्रमांसाठी सेलिब्रिटी व मान्यवरांना आमंत्रित करणे ₹४,००,०००/-
४ डिजिटल जाहिराती, रिक्षाद्वारे तिरंगा गीत ध्वनीक्षेप आणि तिरंगा प्रदर्शन ₹४,००,०००/-
५ सेल्फी पॉईंट, फ्लेक्स, होर्डिंग, कॅनव्हॉस, स्मृतीचिन्ह व रांगोळी प्रदर्शन ₹३,५०,०००/-
६ वृत्तपत्र जाहिराती व इतर अनुषंगिक खर्च (चहापान, नाश्ता इत्यादी) ₹३,००,०००/-
एकूण अपेक्षित एकूण खर्च (+ GST) ₹२१,००,०००/-

मागील वर्षी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी ₹१६,५०,०००/- इतका खर्च झाला होता. यावर्षी उपक्रमांची व्याप्ती वाढल्यामुळे आणि विविध सेलिब्रिटींच्या हजेरीसह भव्य प्रसिद्धी उपक्रम आखल्यामुळे अपेक्षित खर्च ₹२१ लाख निश्चित करण्यात आला असून प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपानुसार यामध्ये वाढ किंवा घट होऊ शकते.
शहरातील सार्वजनिक जागा, रेल्वे स्थानके, शासकीय इमारतींवर तिरंगा प्रदर्शन भरवण्यात येणार असून संपूर्ण शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण करण्यासाठी मनपा प्रशासनाने कंबर कसली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!