news
‘आईच्या हळव्या आठवणी अन् मिश्कील ओळींचा खळखळाट’; रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कवी वैभव जोशींचा ‘द मनमौजी’ बहरला!‘नागरी सुविधांची टोलवाटोलवी खपवून घेणार नाही’; पिंपरी महापालिकेत कब्रस्तानाच्या जागेवरून मुस्लिम बांधवांचा संताप!‘पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा’; पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पदक प्रदान!‘इंटिरिअर डिझायनिंग क्षेत्रात नव्या पिढीला संधींची कवाडे उघडी’; पीसीईटीच्या आकुर्डी संकुलात स्वागत सोहळा संपन्न!‘कोरोना काळातही अविरत सेवा देणाऱ्या टपाल कर्मचाऱ्यांचा गौरव करणे नैतिक जबाबदारी’; जागतिक टपाल दिनी निगडीत सोहळा!
Home पिंपरी चिंचवड विद्युत दाहिनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर गाड्या लावून अंत्यसंस्कारात अडथळा आणणाऱ्या ठेकेदार, कर्मचारी व सुरक्षा रक्षकांवर कठोर कारवाईची मागणी

विद्युत दाहिनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर गाड्या लावून अंत्यसंस्कारात अडथळा आणणाऱ्या ठेकेदार, कर्मचारी व सुरक्षा रक्षकांवर कठोर कारवाईची मागणी

निगडी अमरधाम स्मशानभूमीत मद्यपान आणि पैशांची वसुली; ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कारवाईची सचिन काळभोर यांची मागणी | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

निगडी अमरधाम स्मशानभूमीत मद्यपान, वाहनांची अवैध पार्किंग अन् पैशांची उकळपट्ट्या; सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर मनपा आयुक्तांकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १९ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: निगडी येथील अमरधाम स्मशानभूमी परिसर सध्या ठेकेदाराचा मनमानी कारभार, कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. स्मशानभूमीच्या विद्युत दाहिनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वाहने थेट पार्क केली जात असून, त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मृतदेह लोखंडी जिन्यावरून वाहून नेताना मोठ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. या अत्यंत गंभीर व संवेदनशील प्रकाराची तात्काळ दखल घेत भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे ईमेलद्वारे अधिकृत तक्रार दाखल करून कडक कारवाईची जोरदार मागणी केली आहे.

सचिन काळभोर यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे की, दुःखाच्या प्रसंगी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या शोकाकुल नागरिकांना या ठिकाणी अत्यंत अपमानास्पद आणि भयानक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. स्मशानभूमीत कार्यरत कर्मचारी व अधिकारी मद्यपान करून उद्धट वर्तन करत असून थेट स्मशानभूमीच्या आवारातच दारूच्या पार्ट्या आणि धिंगाणा घातला जात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
त्याहूनही गंभीर बाब म्हणजे, आपल्या आप्तांचा अंतिम संस्कार करण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून अंत्यसंस्काराच्या कामासाठी बेकायदेशीरपणे आर्थिक रकमेची मागणी उघडपणे केली जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना नेहमीच धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी या गंभीर समस्येवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आयुक्तांना पाठवलेल्या तक्रारीत त्यांनी  प्रमुख मागण्या केल्या आहेत.  स्मशानभूमीत नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या आणि दारूच्या पार्ट्या चालवणाऱ्या संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. विद्युत दाहिनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गाड्या पार्क करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक व शिस्तभंगाची कारवाई केली जावी.  मद्यपान करून नागरिकांशी उद्धट वर्तन करणाऱ्या कर्मचारी व कर्तव्यदक्षतेत अपयशी ठरलेल्या सुरक्षा रक्षकांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे.

 

नागरिकांच्या दुःखाचा आणि भावनावश परिस्थितीचा फायदा घेणाऱ्यांविरोधात सचिन काळभोर यांनी घेतलेल्या या कणखर भूमिकेचे निगडी व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांकडून मनापासून कौतुक केले जात आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांवर नेहमीच तत्परतेने धावून जाणाऱ्या काळभोर यांच्या या धडक पाठपुराव्यामुळे स्मशानभूमीतील गैरप्रकारांना चाप बसून नागरिकांना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!