news
‘आईच्या हळव्या आठवणी अन् मिश्कील ओळींचा खळखळाट’; रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कवी वैभव जोशींचा ‘द मनमौजी’ बहरला!‘नागरी सुविधांची टोलवाटोलवी खपवून घेणार नाही’; पिंपरी महापालिकेत कब्रस्तानाच्या जागेवरून मुस्लिम बांधवांचा संताप!‘पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा’; पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पदक प्रदान!‘इंटिरिअर डिझायनिंग क्षेत्रात नव्या पिढीला संधींची कवाडे उघडी’; पीसीईटीच्या आकुर्डी संकुलात स्वागत सोहळा संपन्न!‘कोरोना काळातही अविरत सेवा देणाऱ्या टपाल कर्मचाऱ्यांचा गौरव करणे नैतिक जबाबदारी’; जागतिक टपाल दिनी निगडीत सोहळा!
Home पिंपरी चिंचवड खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन; टाटा मोटर्स, अ‍ॅक्सिस बँक, बजाज यांसारख्या नामांकित कंपन्यांचा सहभाग

खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन; टाटा मोटर्स, अ‍ॅक्सिस बँक, बजाज यांसारख्या नामांकित कंपन्यांचा सहभाग

खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवडमध्ये भव्य नोकरी मेळावा; नामांकित कंपन्यांचा सहभाग | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चिंचवडे लॉन्स येथे ३० ऑगस्ट रोजी ‘खासदार शिवसेना भव्य नोकरी मेळावा’; ५ वी पास ते उच्चशिक्षितांसह दिव्यांगांना रोजगाराची सुवर्णसंधी!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. १९ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: “प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कुटुंबाला रोजगाराची संधी” हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून मावळ लोकसभेचे संसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड येथील चिंचवडे लॉन्स येथे रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याचे नियोजन शिवसेना उपनेत्या व नगरसेविका सुलभाताई उबाळे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे गटनेते व नगरसेवक विश्वजीत बारणे यांनी केले असून, ‘युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’चे संचालक दिपक पवार व किरण रहाणे यांचे या कामी विशेष सहकार्य लाभले आहे.

या नोकरी मेळाव्यात बँकिंग, आयटी, आयटीआय, बीपीओ, केपीओ, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल आणि टेक्नॉलॉजी यांसारख्या विविध क्षेत्रांतील बहुराष्ट्रीय आणि नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, बजाज, ह्युंदाई, हुडास टेक्नॉलॉजी, विगल स्पेस, डॉ. रेड्डीज फाउंडेशन, बीव्हीजी इंडिया यांसारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. या मेळाव्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ५ वी पास उमेदवारांपासून ते आयटीआय (ITI), डिप्लोमा, पदवीधर, इंजिनिअरिंग तसेच इतर उच्चशिक्षित उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यानुसार थेट रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

 या मेळाव्यात दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष सहभागाची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांच्या क्षमता व शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांना स्वयंरोजगार, उद्योजकता, कौशल्य विकास आणि स्वतःचा व्यवसाय कसा उभारावा, याचे विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाणार आहे. मेळाव्यात सहभागी झालेल्या प्रत्येक उमेदवाराला रोजगाराच्या संधीशी जोडण्याचा ध्यास आयोजकांनी घेतला आहे. ज्या उमेदवारांना मेळाव्याच्या दिवशी थेट नोकरी मिळणार नाही, त्यांना ‘खासदार शिवसेना जॉब कार्ड’ देण्यात येईल.
या जॉब कार्डद्वारे उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कौशल्ये व रोजगाराची गरज यांची संपूर्ण माहिती संकलित केली जाईल. सोमवारपासून उपलब्ध संधींनुसार उमेदवारांना मेसेजद्वारे (SMS/WhatsApp) थेट माहिती पाठवली जाईल. त्यामुळे हा मेळावा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता भविष्यातील रोजगाराची दार उघडी करणारा ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड, मावळ व परिसरातील जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवती, महिला, दिव्यांग बांधव आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी ३० ऑगस्ट २०२६ रोजी चिंचवडे लॉन्स अँड बँक्वेट्स हॉल येथे होणाऱ्या या भव्य नोकरी मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!