news
‘आईच्या हळव्या आठवणी अन् मिश्कील ओळींचा खळखळाट’; रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कवी वैभव जोशींचा ‘द मनमौजी’ बहरला!‘नागरी सुविधांची टोलवाटोलवी खपवून घेणार नाही’; पिंपरी महापालिकेत कब्रस्तानाच्या जागेवरून मुस्लिम बांधवांचा संताप!‘पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा’; पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पदक प्रदान!‘इंटिरिअर डिझायनिंग क्षेत्रात नव्या पिढीला संधींची कवाडे उघडी’; पीसीईटीच्या आकुर्डी संकुलात स्वागत सोहळा संपन्न!‘कोरोना काळातही अविरत सेवा देणाऱ्या टपाल कर्मचाऱ्यांचा गौरव करणे नैतिक जबाबदारी’; जागतिक टपाल दिनी निगडीत सोहळा!
Home पिंपरी चिंचवड कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; मुद्रांक शुल्क माफी अन् PMAY अनुदानावर होणार सकारात्मक चर्चा

कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; मुद्रांक शुल्क माफी अन् PMAY अनुदानावर होणार सकारात्मक चर्चा

काशिनाथ नखाते यांच्या पाठपुराव्याला यश; कीवळे गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांच्या सवलतींवर मुंबईत होणार बैठक | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

कीवळे गृहप्रकल्प लाभार्थ्यांना सवलती देण्यासाठी मुंबईत बैठक घेणार; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे आश्वासन!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १९ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: महानगरपालिकेकडून रावेत येथील गृहप्रकल्प रद्द झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) कीवळे येथे पर्याय म्हणून देण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर लवकरच मुंबईत उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचे आश्वासन महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहे। कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष व कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विधान भवन, मुंबई येथे घेतलेल्या भेटीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला।

पिंपरी-चिंचवड मनपाच्या कीवळे गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्या आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे। या पीडित लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी सातत्याने आवाज उठवला आहे।
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत नखाते यांनी लाभार्थ्यांच्या व्यथा व प्रमुख मागण्या मांडल्या। या प्रमुख मागण्यांमध्ये मुद्रांक शुल्क (Stamp Duty) पूर्णपणे माफ करणे, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (PMAY) मिळणारे अनुदान लाभार्थ्यांना तात्काळ मिळवून देणे. या मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळाचे म्हणणे अत्यंत गांभीर्याने ऐकून घेत अण्णा बनसोडे यांनी लाभार्थ्यांच्या हितासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच विशेष बैठकीचे आयोजन करून प्रश्न मार्गी लावण्याचे स्पष्ट आश्वासन दिले. यामुळे काशिनाथ नखाते यांच्या सातत्यपूर्ण संघर्षाला आणि धडक प्रयत्नांना मोठे यश आले आहे.

विधान भवनातील या महत्त्वपूर्ण बैठकीस कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्यासह उपाध्यक्ष राजेश माने, मनपा सदस्य सलीम डांगे, सखाराम केदार, अमृत पाटील, अंगद मुंगळे, तसेच महिला प्रतिनिधी व लाभार्थी सुनीता कावळे, सुमन साठे, मनिषा घोडके, रोशनी सरदार, विष्णू माने आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!