news
महापौर रवी लांडगे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वाहिली आदरांजली; सर्वपक्षीय पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थितीठेकेदारांना अघोषित फर्मान अन् स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी पक्षालाच वेठीस धरण्याचा प्रयत्न; अभ्यासू महापौरांच्या पाठीशी नागरिक व नगरसेवकांचा पाठिंबापिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांसाठी ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य; वर्गणी सक्तीची न करता ऐच्छिक ठेवण्याचे निर्देशजमावबंदी आदेशावरून काँग्रेसचा सत्ताधारी भाजपवर कडाडून हल्ला; विरोधकांच्या आरोपांना भाजपचे सडेतोड प्रत्युत्तरपिंपरी-चिंचवड मनपाच्या शहर अभियंतापदी नियुक्ती झाल्याबद्दल मनोज सेठीयांचा स्थायी समितीच्या सभेत विशेष नागरी सत्कार
Home पिंपरी चिंचवड ठेकेदारांना अघोषित फर्मान अन् स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी पक्षालाच वेठीस धरण्याचा प्रयत्न; अभ्यासू महापौरांच्या पाठीशी नागरिक व नगरसेवकांचा पाठिंबा

ठेकेदारांना अघोषित फर्मान अन् स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी पक्षालाच वेठीस धरण्याचा प्रयत्न; अभ्यासू महापौरांच्या पाठीशी नागरिक व नगरसेवकांचा पाठिंबा

पिंपरी मनपा महासभेत गोंधळ घालून कामकाज थांबवण्याचा प्रयत्न; महापौर रवी लांडगे यांच्या कारभारात अडथळा आणल्याची चर्चा | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महापौर रवी लांडगे यांच्या लोकप्रियतेला तडा देण्याचा प्रयत्न? महापालिकेत सत्ताधारी पक्षनेत्यांच्या मनमानी कारभाराची जोरदार चर्चा!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. २० ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड : महानगरपालिकेच्या महासभेत आज ‘वंदे मातरम’ गीताच्या मुद्द्यावरून सत्ताधारी गटातील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आले आहे. अत्यंत अभ्यासू, संयमी आणि शहराच्या विकासासाठी दिवसरात्र झटणारे महापौर रवी लांडगे यांच्या लोकप्रियतेचा आलेख सातत्याने उंचावत असल्याने, त्यांच्या सुंदर आणि पारदर्शक कारभारात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया आता राजकीय वर्तुळातून उमटू लागली आहे.

महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून रवी लांडगे यांनी शहराच्या सर्वसमावेशक विकासावर भर दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तातडीने सुटावेत, विकासकामांमध्ये पारदर्शकता असावी आणि महापालिकेचे काम गतीने व्हावे, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे अल्पावधीतच शहरात त्यांची प्रतिमा एक लोकप्रिय आणि सक्षम महापौर म्हणून निर्माण झाली आहे.
परंतु, महापौर लांडगे यांच्या उंचावणाऱ्या प्रतिमेमुळे सत्ताधारी गटातीलच काही मंडळींच्या पोटात दुखू लागल्याचे आजच्या महासभेतील प्रकारावरून स्पष्ट झाले आहे.

वरिष्ठांनी ज्येष्ठ नगरसेवक म्हणून प्रशासनाचा अनुभव लक्षात घेऊन प्रशांत शितोळे यांच्याकडे पक्षनेतेपदाची धुरा सोपवली होती. मात्र, पक्षाची ध्येयधोरणे आणि शहराचा विकास बाजूला ठेवून स्वतःचा मनमानी कारभार चालवणे व स्वतःच्याच पक्षाला वेठीस धरण्याचे काम त्यांच्याकडून सुरू असल्याचे चित्र आहे.
कुठल्याही ठेकेदाराने काम सुरू करण्यापूर्वी सत्ताधारी पक्षनेत्यांना भेटलेच पाहिजे, असा एक अघोषित ‘फर्मान’च सुरू असल्याची चर्चा मनपाच्या वर्तुळात जोरदार रंगली आहे. स्वतःची राजकीय पत सांभाळण्यासाठी आणि महापौर रवी लांडगे यांचे यश झाकण्यासाठीच असे प्रकार घडवले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

आजच्या महासभेत विविध नागरी प्रकल्पांचे सादरीकरण करून शहराच्या विकासाला गती देण्याचा महापौर लांडगे यांचा प्रयत्न होता. मात्र, नगरसेवक विनोद नढे यांनी ‘वंदे मातरम’च्या सन्मानार्थ ठराव मांडून सभा तहकूब करण्याची मागणी केली. महापौर रवी लांडगे यांनी नियमाला धरून सभागृहाचे कामकाज सुरू ठेवण्याचा सुजाण आणि लोकहिताचा निर्णय घेतला.
मात्र, महापौरांची प्रतिमा मलीन व्हावी आणि महापालिकेच्या कामकाजात अडथळा निर्माण व्हावा, याच हेतूने काही नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी करत गोंधळ घातला. महापौर रवी लांडगे हे सभागृहाचा ताबा घेऊन कामकाज चालवण्याचा सकारात्मक प्रयत्न करत असताना, जाणीवपूर्वक परिस्थिती नियंत्रणाबाहेर नेण्यात आली आणि अखेर नाईलाजास्तव सभा तहकूब करावी लागली.
वंदे मातरमसारख्या अत्यंत संवेदनशील व राष्ट्रभावनेच्या विषयाचे राजकारण करून महापौरांच्या चांगल्या कामात खोडा घालण्याच्या या प्रकारामुळे, स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाची व शहराची प्रतिमा पणाला लावणाऱ्या पक्षनेत्यांच्या भूमिकेबाबत लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!