news
नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता हेच प्रथम कर्तव्य! रहाटणीत डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाबासाहेब त्रिभुवन ॲक्शन मोडमध्ये!नाव मतदार यादीतून पूर्णपणे वगळलेले नाही; दाव्यांच्या कालावधीत ‘फॉर्म ६’ भरून नोंदणीची पुन्हा संधी!वेफर्स, चिप्स अन् शीतपेयांची शाळांच्या प्रवेशद्वाराजवळ उघड विक्री; पिंपरी-चिंचवडमध्ये सरकारी नियमांचे पार वाजले तीन तेरा!एमआयडीसी आणि मनपाच्या ‘फुटबॉल’ कारभाराला उद्योजक कंटाळले; सर्व नागरी सुविधा एकाच प्राधिकरणाकडे देण्याची मागणी!विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कौटुंबिक स्नेह मेळावा उत्साहात; आमदारांसह लोकप्रतिनिधींची मोठी उपस्थिती!
Home पिंपरी चिंचवड वेफर्स, चिप्स अन् शीतपेयांची शाळांच्या प्रवेशद्वाराजवळ उघड विक्री; पिंपरी-चिंचवडमध्ये सरकारी नियमांचे पार वाजले तीन तेरा!

वेफर्स, चिप्स अन् शीतपेयांची शाळांच्या प्रवेशद्वाराजवळ उघड विक्री; पिंपरी-चिंचवडमध्ये सरकारी नियमांचे पार वाजले तीन तेरा!

जंकफूड बंदी केवळ कागदावरच; पिंपरी महापालिका आणि एफडीएने संयुक्त पथके स्थापन करून कारवाई करण्याची गरज | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शाळांभोवती ‘जंकफूड’चा विळखा कायम! कागदावर बंदी, प्रत्यक्षात सर्रास विक्री; पिंपरी-चिंचवडमध्ये अन्न व औषध प्रशासन अन् महापालिका कधी जागी होणार?

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी सुनील पोकरे, दि. २५ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यातील सर्व शाळांच्या आवारात आणि ५० मीटर परिघात जंकफूडच्या (Junk Food) विक्रीवर, मोफत वाटपावर आणि जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घातली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील चित्र पाहिले तर या सरकारी नियमांना पार हरताळ फासला गेल्याचे दिसत आहे. शहरातील नामांकित शाळांच्या प्रवेशद्वाराजवळच अस्वच्छ आणि आरोग्यास अपायकारक खाद्यपदार्थांची उघडपणे विक्री सुरू असून, महापालिका आणि एफडीएच्या (FDA) अक्षम्य दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत ऐरणीवर आला आहे.

शाळा सुटण्याच्या वेळेस प्रवेशद्वाराजवळ आणि ५० मीटरच्या परिघात छोटे स्टॉल, हातगाड्या आणि फिरते विक्रेते गर्दी करतात. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराची सवय लागावी म्हणून पालक व शिक्षक प्रयत्न करत असताना, शाळेच्या बाहेर पडताच कमी पोषणमूल्य असलेले पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. शाळांच्या आसपास असणाऱ्या लहान-मोठ्या दुकानांमध्ये आणि टपऱ्यांवरही प्रक्रिया केलेले (Processed Food) व अतिसाखर/मीठ असलेले पदार्थ विकले जात आहेत. वेफर्स, चिप्स, कुरकुरे व फ्रेंच फ्राईज, पेस्ट्री, बिस्किटे, केक व बेकरी उत्पादने, चॉकलेट, मिठाई व अति-साखरयुक्त पदार्थ, शीतपेये (Carbonated Soft Drinks) व कृत्रिम ज्यूस, जास्त मीठ, साखर व चरबीयुक्त प्रक्रिया केलेले स्नॅक्स. लहान वयातच जंकफूडची सवय लागल्यामुळे मुलांमध्ये भविष्यात लठ्ठपणा, मधुमेह, पचनाचे विकार आणि जीवनशैलीशी संबंधित इतर गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. केवळ बंदीचे कागदी आदेश काढून जबाबदारी संपत नाही, तर प्रत्यक्ष मैदानावर उतरून कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील हजारो विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा आरोग्य/अतिक्रमण विभाग आणि राज्य अन्न व औषध प्रशासन (FDA) यांनी परस्परांवर जबाबदारी ढकलणे थांबवले पाहिजे.
दोन्ही यंत्रणांनी तातडीने संयुक्त पथके (Joint Task Force) स्थापन करून शाळांच्या परिसराची नियमित पाहणी करावी. नियमांचे उल्लंघन करून जंकफूड विकणाऱ्या दुकानदारांवर, हातगाड्यांवर आणि बेकायदेशीर टपऱ्यांवर धडक जप्ती व दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शहरातील पालकवर्गातून केली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!