25
रहाटणीत धूर फवारणी मोहीम तीव्र! नागरिकांच्या आरोग्यासाठी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन मैदानात
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी सुनील पोकरे, दि. २५ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि नदीच्या वाढत्या पाण्यामुळे डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक श्री. बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन यांनी तात्काळ पावले उचलली आहेत. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे या प्राथमिक ध्येयाने, महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने संपूर्ण रहाटणी गावठाण परिसर आणि परिसरातील विविध गृहनिर्माण संस्थांमध्ये (सोसायट्या) धडक धूर फवारणी मोहीम राबवण्यात आली.
बाबासाहेब त्रिभुवन यांच्या या तत्पर आणि आरोग्यदायी उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता जपण्यासाठी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी स्वतः पुढाकार घेऊन महापालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून संपूर्ण परिसरात धूर फवारणी करून घेतली. या मोहिमेअंतर्गत खालील भागांचा समावेश करण्यात आला. रहाटणी गावठाण, राम मंदिर परिसर, महादेव मंदिर परिसर, भैरवनाथ मंदिर परिसर, गंगानगर आणि पवननगर परिसर, लक्ष्मी भक्ती सोसायटी, सिद्धिविनायक सोसायटी, शिवधाम सोसायटी, स्वप्नसंकुल सोसायटी, के. के. प्रिस्टन, रॉयल हाईट्स, लिजन्सी सोसायटी.
“पावसाळ्यात डासांची उत्पत्ती रोखणे आणि डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका कमी करणे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना सातत्याने राबविणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. माझ्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता यालाच मी सदैव सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आगामी काळातही महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने अशा विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवून नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”— श्री. बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन (नगरसेवक तथा सदस्य, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड मनपा)
नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन हे सातत्याने सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना धावून जाणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. पावसाळा सुरू होताच आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी त्यांनी वेळेत घेतलेल्या या निर्णयामुळे रहाटणी परिसरातील रहिवाशांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
