news
पिंपरी-चिंचवड पोलिसांची बेकायदेशीर नागरिकांवर धडक कारवाई; आतापर्यंत २६ बांगलादेशी नागरिकांना केले डिपोर्ट!नोकरीच्या मागे न धावता स्व-उद्योग! रावेतातील ‘कॅफे अरोमा’ तरुणाईच्या भेटीस सज्ज; आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते शुभारंभ!पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ‘बालस्नेही शहर’ निर्मितीसाठी महत्त्वाचे पाऊल; शहरात धावणार विशेष “चाईल्ड फ्रेंडली बस”!‘स्व-निर्णयक्षमतेतूनच आत्मविश्वास वृद्धिंगत होतो’; PCCOE च्या स्वागत समारंभात संचालक डॉ. गोविंद कुलकर्णींचे प्रतिपादन!‘वैधानिक समित्यांचे अधिकार पायदळी तुडवल्याचा आरोप’; पिंपरी महापालिकेत पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्याविरोधात असंतोषाचा उद्रेक!
Home पिंपरी चिंचवड ‘विद्यार्थी अन् नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही’; निगडीतील कचरा प्रकल्पाविरोधात मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले आक्रमक!

‘विद्यार्थी अन् नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही’; निगडीतील कचरा प्रकल्पाविरोधात मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले आक्रमक!

उद्यानाची जागा कचरा डेपोसाठी वापरण्यास विरोध; मनसेचे शिष्टमंडळ महापालिकेत, ४ दिवसांत निर्णय न झाल्यास जनआंदोलन छेडणार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

निगडी सेक्टर क्र. २२ मधील कचरा प्रक्रिया केंद्राला मनसेचे अध्यक्ष सचिन चिखले यांचा तीव्र विरोध; चार दिवसांत प्रस्ताव रद्द न केल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. १९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: निगडी येथील प्रभाग क्रमांक १३ मधील राहुलनगर, सेक्टर क्रमांक २२ येथे पाण्याच्या टाकीजवळील उद्यानाच्या मोकळ्या जागेत महापालिकेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या कचरा प्रक्रिया केंद्राला (Garbage Processing Plant) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) अतिशय आक्रमकपणे विरोध दर्शविला आहे. नागरिकांचे आरोग्य, विद्यार्थ्यांचे हित आणि परिसरातील पर्यावरण जपण्यासाठी मनसे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन चिखले यांनी पुढाकार घेत या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला आहे. यासंदर्भात सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखालील मनसेच्या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर आणि आयुक्त यांना अधिकृत निवेदन देऊन सदर अन्यायकारक प्रस्ताव आगामी चार दिवसांत तत्काळ रद्द करण्याची ठाम मागणी केली आहे.

नागरिकांच्या सनदशीर हक्कासाठी सातत्याने रस्त्यावर उतरून लढा देणारे मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाच्या या चुकीच्या धोरणावर जोरदार ताशेरे ओढले. सचिन चिखले म्हणाले, “प्रस्तावित कचरा प्रक्रिया केंद्राची जागा ही अत्यंत दाट लोकवस्तीच्या मध्यभागी आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे या पाण्याच्या टाकीपासून अवघ्या ५० मीटर अंतरावर महापालिकेची प्राथमिक व माध्यमिक शाळा कार्यरत आहे. या शाळेत शेकडो निष्पाप विद्यार्थी दैनंदिन शिक्षण घेत आहेत. अशा संवेदनशील आणि दाट लोकवस्तीच्या ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र उभारणे म्हणजे लहान मुलांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळण्यासारखे आहे.”
कचरा प्रक्रिया केंद्रामुळे परिसरात पसरणारी दुर्गंधी, धूळ, विषारी वायू, डास-माशांचा प्रादुर्भाव आणि कचऱ्याच्या गाड्यांच्या सततच्या वर्दळीमुळे होणारे प्रदूषण यामुळे स्थानिक नागरिक, रुग्ण व विद्यार्थ्यांचे जगणे असह्य होईल, असा इशारा चिखले यांनी दिला. तसेच, पाण्याच्या टाकीजवळ हा प्रकल्प झाल्यास पिण्याचे पाणी दूषित होऊन आरोग्य आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता त्यांनी व्यक्त केली.

मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले की, सदर जागा ही उद्यानासाठी राखीव असून ती नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी व सार्वजनिक वापरासाठीच कायम राहिली पाहिजे. तेथे कोणत्याही परिस्थितीत कचरा प्रकल्प उभारू दिला जाणार नाही. चार दिवसांत महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव मागे न घेतल्यास, लहान विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी मनसेच्या वतीने महापालिकेविरोधात व्यापक व तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
या प्रसंगी मनसे शाखाध्यक्ष सागर बहुले आणि सामाजिक कार्यकर्ते प्रबुद्ध कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक व मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकहिताच्या या संवेदनशील प्रश्नावर माजी नगरसेवक सचिन चिखले यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे निगडी व सेक्टर २२ परिसरातील नागरिकांमधून जोरदार स्वागत केले जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!