news
Home पिंपरी चिंचवड ‘उजनीच्या मच्छीमारांवर राजकीय दडपशाही खपवून घेणार नाही’; पिंपरीतून सामाजिक संघटनांचे पाठिंब्याचे पत्र!

‘उजनीच्या मच्छीमारांवर राजकीय दडपशाही खपवून घेणार नाही’; पिंपरीतून सामाजिक संघटनांचे पाठिंब्याचे पत्र!

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कारभारावर मारुती भापकर आक्रमक; बाधित मच्छीमारांचे पुण्यात आमरण उपोषण सुरू | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

उजनीच्या मच्छीमारांच्या आमरण उपोषणाला पिंपरी-चिंचवडमधून मारुती भापकर यांचा जाहीर पाठिंबा!

पुणे/पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २० सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

उजनी धरण क्षेत्रात पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने मच्छीमारीचा व्यवसाय करणाऱ्या कोळी, आदिवासी भिल्ल आणि फासे पारधी समाजाच्या रोजगारावर व पारंपरिक व्यवसायावर डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या मच्छीमारीचे कंत्राट (टेंडर) काढून हे काम काही राजकीय मंडळींनी षडयंत्र रचून स्वतःच्या घशात घालण्याचा कुटील प्रयत्न सुरू केला आहे. या अन्यायाविरोधात ‘कृष्णा खोरे विकास महामंडळ’, सिंचन भवन, पुणे यांच्या कार्यालयासमोर बाधित समाजातील महिला, भगिनी आणि तरुण युवक “आमरण उपोषणाला” बसले आहेत. या उपोषणाला पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते मारुती भापकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.

उपोषणकर्त्यांशी संवाद साधताना मारुती भापकर यांनी प्रशासकीय व राजकीय दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवला. भापकर म्हणाले, “उजनी धरणाच्या पाण्यावर आणि तेथील पारंपरिक मच्छीमारीवर स्थानिक कोळी व आदिवासी बांधवांचाच नैसर्गिक हक्क आहे. मात्र, व्यावसायिक नफ्यासाठी बड्या राजकीय धोरणकर्त्यांकडून टेंडर प्रक्रिया राबवून या गरिबांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.”

पुण्यातील सिंचन भवनासमोर सुरू असलेल्या या आमरण उपोषणाची सरकारने आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाने तातडीने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. जर सरकारने पारंपरिक मच्छीमारांचे हक्क अबाधित न राखल्यास आणि हे टेंडर रद्द न केल्यास पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व जनचळवळी, सामाजिक संघटना आणि नागरिक या आंदोलनात थेट रस्त्यावर उतरून सहभागी होतील, असा स्पष्ट इशारा मारुती भापकर यांनी आंदोलकांना आश्वस्त करताना दिला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!