news
Home पिंपरी चिंचवड ‘गणेशम फेज २’ मधील आगीच्या धुराच्या लोटातून दोन चिमुरड्यांची सुरक्षित सुटका; पिंपरीत अग्निशमन दलाचे शौर्य!

‘गणेशम फेज २’ मधील आगीच्या धुराच्या लोटातून दोन चिमुरड्यांची सुरक्षित सुटका; पिंपरीत अग्निशमन दलाचे शौर्य!

शत्रुघ्न काटे यांच्या वेळेवरील माहितीमुळे अग्निशमन दल घटनास्थळी; जीवाची बाजी लावून जवानांनी चिमुरड्यांना काढले बाहेर | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘गणेशम फेज २’ सोसायटीत भीषण आग; दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका, नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २० सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड:  शहरातील ‘गणेशम फेज २’ या गृहप्रकल्पात अचानक भीषण आग लागल्याची थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. आगीचे वृत्त समजताच माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी अत्यंत सतर्कता आणि तत्परता दाखवत तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. या आगीत धुराचे साम्राज्य पसरून एका खोलीत दोन लहान मुली अडकल्या होत्या; मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि शत्रुघ्न काटे यांच्या वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे दोन्ही चिमुरड्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेविका अनिताताई काटे आणि माजी नगरसेविका कुंदाताई भिसे यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याची पाहणी केली आणि बाधित कुटुंबाला धीर दिला.

नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी थेट अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या गाड्या काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाल्या. आगीत दोन लहान मुले अडकल्याची माहिती मिळताच जवानांनी जीवाची बाजी लावत तातडीने इमारतीमध्ये प्रवेश केला आणि धुराच्या लोलोटांमधून दोन्ही चिमुरड्यांची कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे सुटका केली.

अग्निशमन दलाच्या जवानांकडून अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले आहे. ही आग नेमकी शार्ट सर्किटमुळे लागली की इतर काही कारणांमुळे, याचे प्राथमिक कारण अद्याप प्रशासनाकडून स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दाखवलेली तत्परता, घटनास्थळी पोहोचलेल्या नगरसेविका अनिताताई काटे व कुंदाताई भिसे यांनी दिलेला पाठबळ आणि अग्निशमन दलाच्या जवानांचे शौर्य यामुळे ‘गणेशम फेज २’ मधील संभाव्य मोठी जीवितहानी टळली असून, परिसरातील नागरिकांकडून शत्रुघ्न काटे व अग्निशमन पथकाचे मनापासून आभार मानले जात आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!