news
Home पिंपरी चिंचवड गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची अवैध शस्त्रांविरुद्ध आक्रमक मोहीम; सराईत आरोपी गजाआड!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची अवैध शस्त्रांविरुद्ध आक्रमक मोहीम; सराईत आरोपी गजाआड!

गोपनीय माहितीच्या आधारे चऱ्होलीत कारवाई; पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई; मोका (MCOCA) गुन्ह्यातील फरार आरोपीकडून गावठी बनावटीचे पिस्टल जप्त!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. २२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: गणेशोत्सव सण सुरक्षित, आनंदात आणि शांततेत पार पडावा यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाईचे सत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर खंडणी विरोधी पथकाने (गुन्हे शाखा) धडक कारवाई करत मोका (MCOCA) आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या ५ महिन्यांपासून फरार असलेल्या एका सराईत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. राहुल रमेश चव्हाण (वय २६, रा. भारतमातानगर, दिघी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार प्रदीप पोटे यांना आरोपी राहुल चव्हाण याच्याकडे अवैध शस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले.
दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी चऱ्होली बुद्रुक येथील ९० फुटी रोडवरील म्हसोबा देवस्थानासमोरील मोकळ्या जागेत पथकाने सापळा रचून राहुल चव्हाण याला घेराव घालून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ५३,००० रुपये किमतीची ०१ लोखंडी पिस्टल, ०२ लोखंडी मॅग्झिन आणि ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

अटक करण्यात आलेला आरोपी राहुल चव्हाण हा दिघी पोलीस ठाण्यात दाखल गु. र. क्र. २१५/२०२६ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा – MCOCA कलम ३(i)(ii), ३(२), ३(४) सह BNS आणि हत्यार कायद्यांतर्गत) या गंभीर गुन्ह्यात गेल्या ५ महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत फरार होता.
त्याच्याविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५), भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत नवा गुन्हा (गु. र. क्र. ६०७/२०२६) दाखल करण्यात आला असून, वायसीएम (YCM) रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर त्यास पुढील कारवाईसाठी दिघी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, पोलीस हवालदार प्रदीप पोटे, किरण जाधव, चंद्रकांत जाधव आणि संदीप गंगावणे यांच्या पथकाने केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!