news
Home पिंपरी चिंचवड ‘कठीण सराव अन् क्रीडा संस्कृतीची जोड’; स्वरदा यादवने मल्लखांब स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक!

‘कठीण सराव अन् क्रीडा संस्कृतीची जोड’; स्वरदा यादवने मल्लखांब स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक!

१७ वर्षे वयोगटात मिळवले सर्वाधिक गुण; प्राचार्य डॉ. बिंदू सैनी यांच्याकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या स्वरदा यादवचा मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०३ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा परिषद क्रीडा विभाग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी स्वरदा यादव हिने मल्लखांब स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात पार पडलेल्या १७ वर्षे वयोगटातील या स्पर्धेत रोपे मल्लखांब आणि पोल मल्लखांब या दोन्ही प्रकारांत स्वरदा यादव हिने सर्वाधिक गुण मिळवत हे दैदीप्यमान यश संपादन केले. या चमकदार कामगिरीच्या बळावर तिची पुणे विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचे क्रीडा शिक्षक धनाजी पाटील यांचे तिला मार्गदर्शन लाभले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये शालेय अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारांत प्राविण्य मिळवण्यासाठी दर्जेदार सेवा व क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याच उत्कृष्ट वातावरणाचा व सरावाचा फायदा स्वरदा हिला झाला असून तिने हे यश मिळवले, असे प्रतिपादन शाळेच्या प्राचार्य डॉ. बिंदू सैनी यांनी केले.

स्वरदा यादव हिच्या या घवघवीत यशाबद्दल पीसीईटीचे (PCET) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी स्वरदा यादव, मार्गदर्शक क्रीडा शिक्षक धनाजी पाटील व मुख्याध्यापिका पद्मावती बंडा यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!