news
Home पिंपरी चिंचवड ‘महिलांना अभियांत्रिकी क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी’; इंजिनिअरिंग क्लस्टर पुणेचा कौतुकास्पद उपक्रम!

‘महिलांना अभियांत्रिकी क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी’; इंजिनिअरिंग क्लस्टर पुणेचा कौतुकास्पद उपक्रम!

डसॉल्ट सिस्टीमच्या सीएसआर निधीतून मोफत प्रशिक्षण; ग्रामीण भागातील ५ महिलांना मोफत निवास अन् भोजनाची सोय | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

इंजिनिअरिंग क्लस्टर येथे महिलांसाठी मोफत तांत्रिक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन : सागर शिंदे

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ०३ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: युवती व महिलांना अभियांत्रिकी व उत्पादन क्षेत्रातील रोजगाराच्या संधीसाठी आवश्यक ते तांत्रिक कौशल्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘इंजिनिअरिंग क्लस्टर, पुणे’ या संस्थेच्या वतीने महिलांसाठी सहा महिन्यांचे मोफत ऑफलाइन तांत्रिक प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती संस्थेचे संचालक सागर शिंदे यांनी दिली.
ला फाउंडेशन डसॉल्ट सिस्टीम, पुणे यांच्या सीएसआर (CSR) सहकार्याने राबवल्या जाणाऱ्या “इंडस्ट्रियल एस्पायरा – ॲडव्हान्स सर्टिफिकेशन इन सीएनसी ऑपरेशन डिझाईन अँड कॉलिटी कंट्रोल” या पूर्णतः मोफत असणाऱ्या offline तांत्रिक प्रशिक्षणाची ही तिसरी बॅच आहे. याअंतर्गत ग्रामीण भागातील निवडक ५ महिला प्रशिक्षणार्थींसाठी निवास व भोजनाची सोय देखील मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 हे ६ महिन्यांचे प्रशिक्षण १० ऑक्टोबर २०२६ पासून इंजिनिअरिंग क्लस्टर, पुणे (भोसरी एमआयडीसी, ५३६ जे ब्लॉक, गवळी माथा) येथे सुरू होणार आहे.  यामध्ये सीएनसी प्रोग्रामिंग व ऑपरेशन, डिझाईन, क्वालिटी कंट्रोल, मॅन्युफॅक्चरिंग, सॉफ्ट स्किल्स, प्रत्यक्ष औद्योगिक भेटी, प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि ‘ऑन द जॉब’ ट्रेनिंगचा समावेश आहे. किमान १२ वी उत्तीर्ण आणि १८ ते २५ वर्षे वयोगटातील युवती व महिला यासाठी अर्ज करू शकतात. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर पुणे व परिसरातील इंजिनिअरिंग व मॅन्युफॅक्चरिंग उद्योगांमध्ये रोजगारासाठी प्लेसमेंट सहाय्य (Placement Support) दिले जाणार आहे.

 

तांत्रिक क्षेत्रात उज्ज्वल करिअर करू इच्छिणाऱ्या महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक सागर शिंदे यांनी केले आहे. संपर्क क्रमांक ९०२८५८७८७१ (समन्वयक मनीषा मॅडम), ई-मेल finance@enggclusterpune.com, पत्ता इंजिनिअरिंग क्लस्टर, ५३५ जे ब्लॉक, गवळी माथा, एमआयडीसी भोसरी, पुणे.

 

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!