news
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नाटकांची रेलचेल; ‘वरवरचे वधू-वर’ने मांडले आजच्या पिढीतील नात्यांचे वास्तवRTI मध्ये माहिती लपवल्याचा आरोप; ‘युवा जन सजग नागरिक मंच’चा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशाराआनंद ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा व स्नेहमेळावा उत्साहात; भावगीते, भजने अन् नृत्याने वातावरणात भरला उत्साहमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली; १३ कोटींहून अधिक मतदारांच्या नावांवरून निर्माण झाले गंभीर प्रश्नचिन्हमहाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाउंडेशनकडून उमेदवारी जाहीर; जुनी पेन्शन, प्रलंबित अनुदानासह शिक्षकांच्या प्रश्नांवर लढ्याचा निर्धार
Home पिंपरी चिंचवड ‘उत्तम वास्तुविशारद होण्यासाठी साधना अन् संयम महत्त्वाचा’; आर्किटेक्ट गौरव भांगरे यांचा विद्यार्थ्यांना मौलिक सल्ला!

‘उत्तम वास्तुविशारद होण्यासाठी साधना अन् संयम महत्त्वाचा’; आर्किटेक्ट गौरव भांगरे यांचा विद्यार्थ्यांना मौलिक सल्ला!

एसबीपीसीओएडीच्या पदवीधरांचा आकुर्डीत दिमाखदार सोहळा; फेरो सिमेंट तंत्रज्ञान अन् डिझाईनच्या विविधतेवर मंथन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

वास्तुशास्त्र म्हणजे सर्जनशीलता आणि भावना यांचे प्रतीक; ज्येष्ठ वास्तुविशारद गिरीश दोशींचे प्रतिपादन

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: वास्तुशास्त्र म्हणजे संवेदनशीलता, सर्जनशीलता आणि भावना यांचे एकत्रीकरण करून उभारलेल्या इमारतीचे प्रतीक असते. विद्यार्थ्यांनी अपयशाला न घाबरता सामोरे जावे. आपल्या कामाप्रती श्रद्धा, सबुरी आणि साधना या मूल्यांचा जीवनात उपयोग केल्यास यश आणि आनंद अनुभवता येईल, असे मार्गदर्शन ज्येष्ठ वास्तुविशारद गिरीश दोशी यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) आकुर्डी येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन (SBPCOAD) येथे वास्तूविशारद पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आर्किटेक्ट गौरव भांगरे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी, परीक्षा अधिकारी अजय हराळे, इंटरनल सीनियर सुपरवायझर रुजूता पाठक, यशस्वी विद्यार्थी, पालक प्रतिनिधी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गिरीश दोशी यांनी मागील चार दशकांतील त्यांचा वास्तुशास्त्रीय जीवनप्रवास आणि वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या व्यावसायिक कार्याचे दुर्मिळ छायाचित्रे दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच एखादी कलाकृती किंवा इमारत उभारताना अवकाश, सूर्यप्रकाश, उद्यान आणि डिझाईन यांचा सखोल विचार केला पाहिजे. सध्या आलेल्या नवीन फेरो सिमेंट तंत्रज्ञानामुळे वास्तुविशारद क्षेत्राला मोठी विविधता प्राप्त झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

आर्किटेक्ट गौरव भांगरे यांनी विद्यार्थ्यांना मौलिक सल्ला देत सांगितले की, “उत्तम वास्तुविशारद होण्यासाठी साधना, संयम आणि सातत्य या मूल्यांचा अंगीकार केला पाहिजे. पदवी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी किमान तीन वर्षे तरी एखाद्या ज्येष्ठ वास्तूविशारदाच्या अधिपत्याखाली काम करावे, ज्यामुळे त्यांच्या अनुभवातून खूप काही शिकता येईल. काम करताना क्लायंट आणि गवंडी या सर्वांची मानसिकता जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.”
कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. शिवा शिशोविया यांनी तर आभार प्रा. दक्षा देशमुख यांनी मानले. लक्ष्मण तोरगळे, किसन काळे, इतर प्राध्यापक आणि स्वयंसेवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!