news
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नाटकांची रेलचेल; ‘वरवरचे वधू-वर’ने मांडले आजच्या पिढीतील नात्यांचे वास्तवRTI मध्ये माहिती लपवल्याचा आरोप; ‘युवा जन सजग नागरिक मंच’चा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशाराआनंद ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा व स्नेहमेळावा उत्साहात; भावगीते, भजने अन् नृत्याने वातावरणात भरला उत्साहमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली; १३ कोटींहून अधिक मतदारांच्या नावांवरून निर्माण झाले गंभीर प्रश्नचिन्हमहाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाउंडेशनकडून उमेदवारी जाहीर; जुनी पेन्शन, प्रलंबित अनुदानासह शिक्षकांच्या प्रश्नांवर लढ्याचा निर्धार
Home पिंपरी चिंचवड ‘कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी साधत देशाचा विकास साधा’; पुणे बिझनेस स्कूलच्या इंडक्शन सोहळ्यात तज्ज्ञांचे आवाहन!

‘कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी साधत देशाचा विकास साधा’; पुणे बिझनेस स्कूलच्या इंडक्शन सोहळ्यात तज्ज्ञांचे आवाहन!

पीसीईटी संचलित पीबीएसमध्ये नवीन बॅचचा शुभारंभ; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर डॉ. मीनाक्षी त्यागींचा भर | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पीबीएसच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान द्यावे – डॉ. गणेश राव

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ०६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: कॉर्पोरेट क्षेत्रात सक्षम नेतृत्व घडविण्यासाठी पुणे बिझनेस स्कूलचा (PBS) दोन वर्षांचा व्यवस्थापन अभ्यासक्रम मार्गदर्शक ठरणार आहे. या ठिकाणी उच्च शिक्षणाबरोबरच नेतृत्व, व्यावसायिक सक्षमता, नावीन्य आणि बदलत्या व्यावसायिक वातावरणाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित होईल. याचा पीबीएसच्या विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ घेऊन आपले करिअर घडवावे आणि देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन पीबीएसचे संचालक व प्राचार्य डॉ. गणेश राव यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) आकुर्डी येथील पुणे बिझनेस स्कूलमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पीबीएसच्या डीन डॉ. मीनाक्षी त्यागी, मास्टर कार्डचे मध्यपूर्व आफ्रिका आणि युरोप संचालक हेमंत शर्मा, इंडिया डिजिटल ॲग्रीकल्चर कौन्सिलचे अध्यक्ष दुष्यंत त्यागी, संचेती हेल्थकेअर ॲकॅडमीच्या मानव संसाधन प्रमुख अजंता डे, बायर ग्लोबल प्रोक्युरमेंट व्यवस्थापक सीमा मोहंती, केपीआयटीचे संचालक मृणाल मजुमदार, नाऊ यू सीड इंडिया प्रा. लि. चे विपणन उपाध्यक्ष संदीप कुलकर्णी, व्हर्लपूल इंडियाचे उपव्यवस्थापक दिनेश शिंदे, टाटा मोटर्सच्या डीजीएम प्रमुख अर्चना सराफ, झायडस बायोलॉजिक्सचे शिक्षण आणि विकास प्रमुख विवेक शर्मा व फर्टिओनिक्स सोल्युशन्स एलएलपीचे संचालक जितेंद्र कोळपे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मीनाक्षी त्यागी म्हणाल्या की, “पीबीएसमधील प्रवेश म्हणजे उद्योगांसाठी व्यवस्थापकीय क्षमता, नैतिक मूल्ये आणि समाजावर सकारात्मक प्रभाव पाडण्याची वचनबद्धता असणारे सक्षम नेतृत्व घडवणे होय. येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, औद्योगिक भेटी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन या माध्यमातून विद्यार्थ्यांना नावीन्य व व्यावसायिक उत्कृष्टतेची ओळख करून दिली जाते.”
कार्यक्रमात उपस्थित कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांनी स्वीकारायची नेतृत्वाची जबाबदारी आणि विविध क्षेत्रांतील उदयोन्मुख संधी या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वागत समारंभाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!