news
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नाटकांची रेलचेल; ‘वरवरचे वधू-वर’ने मांडले आजच्या पिढीतील नात्यांचे वास्तवRTI मध्ये माहिती लपवल्याचा आरोप; ‘युवा जन सजग नागरिक मंच’चा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशाराआनंद ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा व स्नेहमेळावा उत्साहात; भावगीते, भजने अन् नृत्याने वातावरणात भरला उत्साहमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली; १३ कोटींहून अधिक मतदारांच्या नावांवरून निर्माण झाले गंभीर प्रश्नचिन्हमहाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाउंडेशनकडून उमेदवारी जाहीर; जुनी पेन्शन, प्रलंबित अनुदानासह शिक्षकांच्या प्रश्नांवर लढ्याचा निर्धार
Home पिंपरी चिंचवड ‘मैदानी खेळांचा उत्साह अन् आशियाई सुवर्ण विजेतीची उपस्थिती’; पिंपरी चिंचवडमध्ये शालेय खो-खो स्पर्धेचा भव्य सोहळा!

‘मैदानी खेळांचा उत्साह अन् आशियाई सुवर्ण विजेतीची उपस्थिती’; पिंपरी चिंचवडमध्ये शालेय खो-खो स्पर्धेचा भव्य सोहळा!

१४ वर्षांखालील गटात खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्राथमिक फेरीत भोसरी अन् श्रमिक नगर संघांचे दणदणीत विजय | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद आयोजित शालेय खो-खो स्पर्धेचे थाटात उद्घाटन; १४ वर्षांखालील गटात १४८ संघांचा सहभाग!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन २०२६ च्या शालेय खो-खो स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा काल, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात तब्बल १४८ संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. जापान येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत आर्चरी (धनुर्विद्या) या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक विजेती पृशिका प्रदीप हिच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी पुणे विभागीय क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील, सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे प्रशिक्षक कुणाल तावरे, इंग्लिश मीडियम स्कूल एस. एस. पी. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस. बी. पाटील, संस्थेचे सहसंचालक सुनील शेवाळे, क्रीडा अधिकारी दीपक कन्हेरे, क्रीडा मार्गदर्शक सिरीन गोडबोले, निवृत्ती काळभोर, क्रीडा पर्यवेक्षक अरुण कडूस आणि सुनिता पालवे आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कुमार कटके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रवींद्र गारगोटे यांनी मानले.

१) भोसरी मुले विरुद्ध एम. एस. एस. हायस्कूल चिंचवड– भोसरी मुलांच्या संघाने एम. एस. एस. हायस्कूल चिंचवड संघाचा १०-०२ अशा मोठ्या फरकाने पराभव करत दणदणीत विजय मिळवला.
२) श्रमिक नगर क्रमांक ९४ विरुद्ध स्वामी समर्थ सीबीएसई– श्रमिक नगर क्रमांक ९४ संघाने अत्यंत चुरशीच्या सामन्यात स्वामी समर्थ सीबीएसई संघाचा ८-५ असा पराभव केला.
३) गुरु गणेश विरुद्ध विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल– गुरु गणेश संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलवर विजय संपादन केला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!