news
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नाटकांची रेलचेल; ‘वरवरचे वधू-वर’ने मांडले आजच्या पिढीतील नात्यांचे वास्तवRTI मध्ये माहिती लपवल्याचा आरोप; ‘युवा जन सजग नागरिक मंच’चा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशाराआनंद ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा व स्नेहमेळावा उत्साहात; भावगीते, भजने अन् नृत्याने वातावरणात भरला उत्साहमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली; १३ कोटींहून अधिक मतदारांच्या नावांवरून निर्माण झाले गंभीर प्रश्नचिन्हमहाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाउंडेशनकडून उमेदवारी जाहीर; जुनी पेन्शन, प्रलंबित अनुदानासह शिक्षकांच्या प्रश्नांवर लढ्याचा निर्धार
Home पिंपरी चिंचवड पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे निलखमध्ये सामाजिक बांधिलकी; अंगणवाडी ताईंच्या सेवेचा गौरव

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे निलखमध्ये सामाजिक बांधिलकी; अंगणवाडी ताईंच्या सेवेचा गौरव

नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांच्या पुढाकाराने बालकांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप; स्थानिक नागरिकांकडून कौतुक l© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत पिंपळे निलखमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा गौरव; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०७ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: देशाचे लाडके पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत पिंपळे निलख परिसरामध्ये सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम पार पडला. स्थानिक नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांच्या विशेष आयोजनातून पिंपळे निलख येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा विशेष सन्मान करून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी जनहितार्थ व सामाजिक भान जपत या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन केले होते.

बालकांचे सुयोग्य संगोपन, प्राथमिक शिक्षण आणि कुपोषणमुक्तीसाठी तळागाळात जाऊन निष्ठेने कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस (ताई) हे खऱ्या अर्थाने सशक्त समाजाचा पाया आहेत. त्यांच्या या अविरत सेवेची दखल घेत नगरसेवक कुणाल वाव्हळकर आणि उपस्थितांच्या हस्ते त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
याप्रसंगी परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट आणि खाऊचे वाटप करण्यात आले. शालेय साहित्य मिळाल्याने लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

या सामाजिक उपक्रमा प्रसंगी नगरसेविका व ‘ज’ प्रभाग अध्यक्षा आरतीताई चोंधे, पियुषाताई पाटील, अरुणाताई सूर्यवंशी आणि सुवर्णा गाडे यांच्यासह स्थानिक नागरिक, महिला आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भावना व्यक्त करताना नगरसेवक कुणाल वाव्हळकर म्हणाले, “अंगणवाडी ताईंच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान करत सकारात्मक आणि समाजोपयोगी उपक्रमांची ही वाटचाल अशीच अविरत सुरू राहील.”
नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांच्या या संवेदनशील, तत्पर आणि लोकभिमुख कार्यपद्धतीमुळे पिंपळे निलख व चिंचवड परिसरातील जनसामान्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाची व प्रतिमेची पुन्हा एकदा विशेष प्रशंसा होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!