news
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नाटकांची रेलचेल; ‘वरवरचे वधू-वर’ने मांडले आजच्या पिढीतील नात्यांचे वास्तवRTI मध्ये माहिती लपवल्याचा आरोप; ‘युवा जन सजग नागरिक मंच’चा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशाराआनंद ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा व स्नेहमेळावा उत्साहात; भावगीते, भजने अन् नृत्याने वातावरणात भरला उत्साहमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली; १३ कोटींहून अधिक मतदारांच्या नावांवरून निर्माण झाले गंभीर प्रश्नचिन्हमहाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाउंडेशनकडून उमेदवारी जाहीर; जुनी पेन्शन, प्रलंबित अनुदानासह शिक्षकांच्या प्रश्नांवर लढ्याचा निर्धार
Home मुख्यपृष्ठ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली; १३ कोटींहून अधिक मतदारांच्या नावांवरून निर्माण झाले गंभीर प्रश्नचिन्ह

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली; १३ कोटींहून अधिक मतदारांच्या नावांवरून निर्माण झाले गंभीर प्रश्नचिन्ह

भारतीय निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून आक्षेप; ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निदर्शने © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील वादावर आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात संतापाची लाट!

नवी दिल्ली, प्रतिनिधी दि. ०७ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

भारताची निवडणूक व्यवस्था ही जगभरात पारदर्शकता आणि राजकीय प्रभावापासून दूर राहण्यासाठी ओळखली जाते. अगदी शेजारील देशांमध्येही तिची प्रशंसा केली जाते. मात्र, सध्या भारतीय निवडणूक आयोग (ECI) आणि मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार हे जागतिक माध्यमांच्या टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेवरून देशभरात उठलेले विरोधाचे वादळ आता जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरले आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या एका शोधपत्रकारिता अहवालानंतर पेटलेला हा वाद आता निवडणूक आयोगाच्या ७६ वर्षांच्या विश्वासार्हतेला आव्हान देत असून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत सुमारे शंभर कोटी लोकांना आपले मतदानाचा हक्क सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे दाखवावी लागत आहेत. गरिबांना रोजंदारी सोडायची की मतदान केंद्राच्या फेऱ्या मारायच्या असा प्रश्न पडला आहे. ‘अनुपस्थित’ आणि ‘स्थलांतरित’ या नावाखाली ९ कोटी मतदारांची नावे हटवण्यात आल्यामुळे आगामी आणि मागील निवडणुकांच्या निष्पक्षतेवर संशय निर्माण होत असल्याचे नियतकालिकाने नमूद केले. – द न्यूयॉर्क टाइम्स (The New York Times

 

‘एकही मतदार सुटू नये’ (No Voter to be Left Behind) हे ब्रीदवाक्य असलेल्या आयोगाची प्रतिष्ठा डागाळली गेल्याचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांच्या हवाल्याने म्हटले आहे. २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला बगल देऊन सरकारने नियुक्तीच्या नियमांत बदल केल्यामुळे आयोगाच्या स्वायत्ततेला धक्का बसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. – द इकॉनॉमिस्ट (The Economist)

 

तीन दशकांच्या कारकीर्दीत कठीण आणि संवेदनशील कामे फत्ते करणारे ६२ वर्षीय वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश कुमार आता स्वतःच्याच संस्थेच्या निर्णयांचे समर्थन करताना अडचणीत सापडले आहेत. – बीबीसी (BBC)

 

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि SIR प्रक्रिया थांबवण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनांवर झालेल्या पोलीस कारवाईची (अश्रूधुर, पाण्याचे फवारे) दखल घेण्यात आली असून आगामी राज्य निवडणुकांआधी हा वाद अधिक पेटण्याची शक्यता वर्तवली आहे. – फायनान्शियल टाइम्स (Financial Times)

 

विरोधी पक्षांसह तरुण व विद्यार्थ्यांच्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ सारख्या दबाव गटांनी देशभरात तीव्र आंदोलने सुरू केली आहेत. जुलै महिन्यात झालेल्या पेपर लीक प्रकरणानंतर शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण झाली होती, त्याच धर्तीवर आता “जंतर मंतर सीजन २” आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
फॉर्म ७ च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आक्षेप नोंदवून विशिष्ट समुदायांची नावे यादीतून वगळली गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे देशातील निवडणूक प्रणालीचे भवितव्य आणि तिची निष्पक्षता यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!