news
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नाटकांची रेलचेल; ‘वरवरचे वधू-वर’ने मांडले आजच्या पिढीतील नात्यांचे वास्तवRTI मध्ये माहिती लपवल्याचा आरोप; ‘युवा जन सजग नागरिक मंच’चा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशाराआनंद ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा व स्नेहमेळावा उत्साहात; भावगीते, भजने अन् नृत्याने वातावरणात भरला उत्साहमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली; १३ कोटींहून अधिक मतदारांच्या नावांवरून निर्माण झाले गंभीर प्रश्नचिन्हमहाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाउंडेशनकडून उमेदवारी जाहीर; जुनी पेन्शन, प्रलंबित अनुदानासह शिक्षकांच्या प्रश्नांवर लढ्याचा निर्धार
Home मुख्यपृष्ठ आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा व स्नेहमेळावा उत्साहात; भावगीते, भजने अन् नृत्याने वातावरणात भरला उत्साह

आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा व स्नेहमेळावा उत्साहात; भावगीते, भजने अन् नृत्याने वातावरणात भरला उत्साह

'छोटे उस्ताद' प्रथमेश गायकवाडच्या सुरेल गायनाला रसिकांची दाद; वाढदिवस व सांस्कृतिक कार्यक्रमाने वाढवला उत्साह l© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा अन् संगीत सोहळा उत्साहात; ‘मी होणार सुपरस्टार’ फेम प्रथमेश गायकवाडच्या सुरांवर आजी-आजोबा थिरकले!

पिंपरी प्रतिनिधी सुनील पोकरे , दि. ०७ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

वाकड: वाढत्या वयातही मनातील उत्साह अन् जीवन जगण्याचा आनंद कायम राखत वाकड येथील ‘आनंद ज्येष्ठ नागरिक संघ’ (पोस्टल कॉलनी, दत्तमंदिर रोड) यांच्या वतीने मासिक सभा, वाढदिवस सोहळा आणि बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी वाकड चौकाजवळील हॉटेल साई सागर येथे पार पडलेल्या या सोहळ्यात संगीताच्या तालावर ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त नृत्य करत आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडवले.
सकाळच्या सत्रात संघाची नियमित मासिक सभा व चालू महिन्यात वाढदिवस असलेल्या सर्व ज्येष्ठ सदस्यांचा वाढदिवस सोहळा आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यानंतर दुपारच्या सत्रात विशेष मनोरंजन व संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो ‘मी होणार छोटे उस्ताद’ फेम बालगायक कुमार प्रथमेश गायकवाड याचे बहारदार गायन ठरले. प्रथमेशने आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरांनी संपूर्ण वातावरण संगीतमय करून टाकले.
त्याने सादर केलेली भावगीते, भजने, अभंग, पोवाडे, भारुड आणि गवळणी यामुळे उपस्थितांना संगीताची पर्वणी मिळाली. बालगायकाच्या या सुरेल सादरीकरणाला सर्व ज्येष्ठ नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.

संगीताची लय आणि प्रथमेशच्या गाण्यांचा ताल ऐकून ज्येष्ठ नागरिकांनाही आपला उत्साह आवरता आला नाही. अनेक सभासदांनी नृत्यामध्ये सहभाग नोंदवत गाण्याच्या ठेक्यावर आनंदाने पाय थिरकवले. उतारवयातही मनातील आनंद आणि उत्साह कसा जपावा, याचा वस्तुपाठच या प्रसंगी उपस्थितांनी घालून दिला.
ज्येष्ठ नागरिकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि दैनंदिन जीवनातील ताणतणाव दूर होऊन परस्परांमधील आपुलकी वाढण्यासाठी असे उपक्रम अत्यंत गरजेचे असल्याचे मत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत आल्हाददायक आणि कौटुंबिक वातावरणात पार पडला.
© २०२६ मॅक्स मंथन Daily News. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!