news
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नाटकांची रेलचेल; ‘वरवरचे वधू-वर’ने मांडले आजच्या पिढीतील नात्यांचे वास्तवRTI मध्ये माहिती लपवल्याचा आरोप; ‘युवा जन सजग नागरिक मंच’चा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशाराआनंद ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा व स्नेहमेळावा उत्साहात; भावगीते, भजने अन् नृत्याने वातावरणात भरला उत्साहमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली; १३ कोटींहून अधिक मतदारांच्या नावांवरून निर्माण झाले गंभीर प्रश्नचिन्हमहाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाउंडेशनकडून उमेदवारी जाहीर; जुनी पेन्शन, प्रलंबित अनुदानासह शिक्षकांच्या प्रश्नांवर लढ्याचा निर्धार
Home पिंपरी चिंचवड अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नाटकांची रेलचेल; ‘वरवरचे वधू-वर’ने मांडले आजच्या पिढीतील नात्यांचे वास्तव

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नाटकांची रेलचेल; ‘वरवरचे वधू-वर’ने मांडले आजच्या पिढीतील नात्यांचे वास्तव

पिंपरीत अभिजात मराठी भाषा सप्ताहाला नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; गुरुवारी बालनाट्य आणि सांगीतिक मेजवानी! © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीत हास्याचा ‘ऑल दि बेस्ट’; ‘वरवरचे वधू-वर’ने दाखविला नात्यांचा आरसा!

पिंपरी प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०७ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: हास्याचे क्षण, मैत्रीची ताकद आणि आजच्या पिढीतील बदलत्या नात्यांचे वास्तव मांडणाऱ्या दोन दर्जेदार नाटकांनी मंगळवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रंगत आणली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’च्या निमित्ताने ‘ऑल दि बेस्ट’ आणि ‘वरवरचे वधू-वर‘ या नाटकांच्या प्रयोगांना नाट्यरसिकांची तुफान गर्दी उसळली होती. दोन्ही प्रयोगांना प्रेक्षकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने प्रेक्षागृह पूर्णपणे हाऊसफुल झाले होते.
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे आणि मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान हा सप्ताह साजरा होत आहे.

दुपारच्या सत्रात देवेंद्र पेम लिखित ‘ऑल दि बेस्ट’ या नाटकाचा प्रयोग झाला. मयुरेश पेम, मनमित पेम आणि निखिल चव्हाण यांच्या विनोदी अभिनय व संवादांनी प्रेक्षकांना हसवून लोटपोट केले. शारीरिक अक्षमतेवर मात करत आत्मविश्वासाने जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि मैत्रीचे महत्त्व या नाटकातून अधोरेखित करण्यात आले.
सायंकाळच्या सत्रात विराज कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित ‘वरवरचे वधू-वर‘ हे नाटक रंगले. सुव्रत जोशी, सखी गोखले आणि सूरज पारसनीस यांच्या अभिनयाने सजलेल्या या नाटकातून आजच्या तरुण-तरुणींचा विवाह, नात्यांमधील अपेक्षा आणि ‘कमिटमेंट’ बाबतचा संभ्रम मिश्कील व विनोदी पद्धतीने मांडण्यात आला.

१. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड– सकाळी ८.३० वा. बालनाट्य – ‘चार्ली – चॅपलिन आणि जादूचा कंठमणी’ (लेखक: विजय पटवर्धन), दुपारी १२.०० वा. ‘गझल आख्यान’ , दुपारी ३.३० वा. ‘चांगभलं – व्हॉईस ऑफ दख्खन’ , सायंकाळी ५.३० वा. कवी वैभव जोशी यांचा ‘द मनमौजी’ (कविता व गझल) , रात्री ९.३० वा. ‘म…मराठीचा’ सांगीतिक सोहळा

 

२. नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, सांगवी– दुपारी १२.०० वा. नाटक – ‘कथा वंगभंगाची’ (‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षानिमित्त) , सायंकाळी ५.०० वा. ‘सूर तरुणाईचा.. ध्यास मराठीचा’ (गायक: विनल देशमुख, वर्षा एखंडे, अश्विनी मिटे)

 

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!