news
Home पिंपरी चिंचवड ‘गस्तीदरम्यान संशयितांना घेतले ताब्यात अन् फुटली गुन्ह्यांची साखळी’; युनिट-४ कडून ५ आरोपींना बेड्या!

‘गस्तीदरम्यान संशयितांना घेतले ताब्यात अन् फुटली गुन्ह्यांची साखळी’; युनिट-४ कडून ५ आरोपींना बेड्या!

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांच्या पथकाची धडक कारवाई; आरोपी पोलिसांच्या हवाली | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-४ ची धडक कामगिरी; २ घरफोड्या अन् २ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०८ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने धडक कारवाई करत दोन सराईत चोरट्यांसह त्यांच्या इतर साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे चिखली, चाकण आणि म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २ घरफोड्या आणि २ वाहनचोरीचे असे एकूण ४ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी संशयितांकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत.

वरिष्ठांच्या सूचनेनुसार ६ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले आणि कर्मचारी पिंपरी चिंचवड हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या ऋषिकेश राजेंद्र भोसले (वय २५, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे), अशोक राजेंद्र भोसले (वय २५, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) आणि त्यांच्या इतर तीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून १,४०,००० रुपये किमतीच्या दोन स्प्लेंडर/डिलक्स सायकली (क्र. MH 13 CA 8628 आणि MH 14 BW 3927) जप्त करण्यात आल्या. आरोपींकडे अधिक सखोल चौकशी केली असता, त्यांनी चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ घरफोड्या केल्याची कबुली दिली.
उघडकीस आलेले गुन्हे
१. चाकण पोलीस ठाणे: गु.र.नं. ९३०/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२))
२. म्हाळुंगे पोलीस ठाणे: गु.र.नं. १३१/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२))
३. चिखली पोलीस ठाणे: गु.र.नं. २३९/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ (अ))
४. चिखली पोलीस ठाणे: गु.र.नं. ३८७/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ (४))
कारवाईनंतर आरोपी ऋषिकेश भोसले व त्याच्या दोन साथीदारांना पुढील कारवाईसाठी चाकण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तर आरोपी अशोक भोसले व त्याच्या एका साथीदाराची वैद्यकीय तपासणी करून त्यांना म्हाळुंगे पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सपोनि श्रीधर भोसले, सहाय्यक फौजदार लोणकर, पोलीस अंमलदार मोरे, महाडीक, सोडगीर, असवले, सोनटक्के, बोराटे, मेरगळ, वेताळ, खेडकर, सुखदाने, मुंडे, नागरे, सोनवणे, बाळसराफ, खराडे आणि माटे यांच्या पथकाने केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!