news
Home अमरावती ‘शिक्षक मतदारसंघासाठी आयएएस अभय महाजन निवडणूक निरीक्षक’; तक्रारी अन् निवेदनासाठी संपर्क तपशील जाहीर!

‘शिक्षक मतदारसंघासाठी आयएएस अभय महाजन निवडणूक निरीक्षक’; तक्रारी अन् निवेदनासाठी संपर्क तपशील जाहीर!

भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्ती; शासकीय विश्रामगृहावर दररोज सकाळी ११ ते १२ दरम्यान भेटीची वेळ | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

विधानपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून अभय महाजन यांची नियुक्ती!

अमरावती, प्रतिनिधी दि. ०८ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून ‘निवडणूक निरीक्षक’ (General Observer) म्हणून अभय अरविंद महाजन (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने ही महत्त्वाची नियुक्ती केली आहे.

निवडणूक प्रक्रियेशी संबंधित तक्रारी, सूचना किंवा निवेदने देण्यासाठी उमेदवार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिकांना निवडणूक निरीक्षक अभय महाजन यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.
  • मुक्कामाचा पत्ता: ‘तापी’ व्ही.आय.पी. कॉटेज, सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय विश्रामगृह, चपराशीपुरा, अमरावती.
  • भेटण्याची वेळ: दररोज सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० या वेळेत.
  • संपर्क भ्रमणध्वनी क्र.: ८९९९१०८९१२
  • ईमेल आयडी: amravatigeneralobserver@gmail.com
निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी आणि आचारसंहितेचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी निवडणूक प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!