news
Home अमरावती ‘शिक्षक मतदारसंघात ३० उमेदवार वैध, वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद’; विभागीय आयुक्त नयना गुंडे यांची माहिती!

‘शिक्षक मतदारसंघात ३० उमेदवार वैध, वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद’; विभागीय आयुक्त नयना गुंडे यांची माहिती!

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या अंतिम मुदत; निवडणूक निरीक्षक अभय महाजन यांच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया पूर्ण | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

छाननीअंती ३० उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध; वंचितच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला!

अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. ०८ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्रांच्या छाननीमध्ये ३१ पैकी ३० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्याने छाननीअंती निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या आता ३० झाली आहे. या संदर्भातील माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार ७ ऑक्टोबर २०२६ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयातील सभा कक्षात ही छाननी प्रक्रिया पार पडली. या वेळी निवडणूक निरीक्षक अभय महाजन, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

वैध ठरलेले प्रमुख उमेदवार (३०) अदिती ऋषिकेश पोहरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), किरणराव रामराव सरनाईक (शिवसेना), दत्तात्रय श्रीराम लहाने (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे), प्रा. अनिल मधुकरराव काळे (बळीराजा पार्टी), गजानन गोविंदराव ढोके (भारतीय जनसम्राट पार्टी), प्रिती हर्षल रेवणे (राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी), सुरेश बाबुराव देवकर (समाजवादी गणराज्य पार्टी).

 

अपक्ष उमेदवार श्रीकांत गोविंद देशपांडे, डॉ. संगीता शिंदे-बोंडे, प्रा. डॉ. संतोष हुशे, अविनाश बोर्डे, अशोक हिवाळे, आशिष अंबुलकर, उपेंद्र पाटील, किरण चौधरी, किरण पवार, गजानन उल्हे, दिलीप कडू, नितीन आगे, डॉ. प्रशांत विघे, चंद्रशेखर भोयर (शेखर), मिलिंद ब्राह्मणे, राजेशकुमार कड, रामदास कटक, विनोद कडू, श्रीकृष्ण पहुरकर, सजील खान खलील खान, सुनील राठोड, सुमित पवार आणि हेमलता मुणोत.

 

अवैध ठरलेला अर्ज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गाजी मोहम्मद जाहेरोश यांचा अर्ज छाननीत त्रुटी आढळल्याने अवैध ठरला आहे.

 

निवडणूक कार्यक्रमानुसार, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत आहे. उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीला विभागीय आयुक्त कार्यालयात लेखी सूचना देऊन अर्ज मागे घेता येईल. यानंतरच अमरावती शिक्षक मतदारसंघातील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!