news
Home पुणे ‘तंत्रज्ञान अन् गुन्हे तपासात महाराष्ट्र पोलीस सरस’; सीआयडी आयोजित कर्तव्य मेळाव्यात अमोल कोकरे, आशिष पाटील व ए. ए. गमरे सुवर्णपदकाचे मानकरी!

‘तंत्रज्ञान अन् गुन्हे तपासात महाराष्ट्र पोलीस सरस’; सीआयडी आयोजित कर्तव्य मेळाव्यात अमोल कोकरे, आशिष पाटील व ए. ए. गमरे सुवर्णपदकाचे मानकरी!

पुण्यातील एसआरपीएफ गट क्र. २ वर विजेत्यांचा गौरव; विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते पदके प्रदान | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०२६: ‘आयटी’, ‘एंटी सबोटाज’ आणि ‘फोटोग्राफी’ स्पर्धांचे निकाल जाहीर!

पुणे/पिंपरी प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. ०८ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) वतीने आयोजित २१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०२६ मधील विविध तांत्रिक व तपासाशी संबंधित स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. अत्यंत निकोप, पारदर्शक आणि चुरशीच्या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांचा राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्र. २ येथे आयोजित विशेष सोहळ्यात पदके प्रदान करून गौरव करण्यात आला.
विशेष पोलीस महानिरीक्षक (राज्य गुन्हे अभिलेख केंद्र, CID) दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करण्यात आली. या प्रसंगी CID चे पोलीस अधीक्षक (कार्यालय व समन्वय) विवेक पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१) IT Proficiency Competition (Event – 1: Objective Test)
सुवर्ण पदक श्री. अमोल कोकरे (सहाय्यक पोलीस फौजदार, बिनतारी संदेश विभाग, पुणे) , रजत पदक श्री. राजेश कंचे (पोलीस हवालदार, नांदेड परिक्षेत्र), कास्य पदक श्री. संदीप राणे (सहाय्यक पोलीस फौजदार, मिरा-भाईंदर-वसई-विरार).

 

२) Anti Sabotage Check Competition (Ground Search)
सुवर्ण पदक श्री. आशिष बाळकृष्ण पाटील (पोलीस नाईक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी), रजत पदक श्री. सतिश बाळकृष्ण गायकवाड (पोलीस नाईक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी), कास्य पदक श्री. पंकज हुळके (पोलीस हवालदार, गडचिरोली परिक्षेत्र).

 

३) Police Photography Competition
सुवर्ण पदक श्री. ए. ए. गमरे (पोलीस हवालदार, कोकण परिक्षेत्र), रजत पदक श्री. तुलशीदास पहारे (पोलीस शिपाई, दहशतवाद विरोधी पथक – ATS), कास्य पदक श्री. सचिन सोपान चव्हाण (पोलीस शिपाई, ठाणे शहर).

 

५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झालेल्या या २१ व्या राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात राज्यातील पोलीस दलाची तांत्रिक कौशल्ये, संगणकीय ज्ञान, गुन्हे तपास पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानातील प्राविण्य पारखले जात आहे. निष्णात पंचांच्या देखरेखीखाली या स्पर्धा पार पडत असून वरिष्ठ अधिकारी या उप-स्पर्धांचे पर्यवेक्षण करत आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!