news
Home मुख्यपृष्ठराजकारण माझी लाडकी बहीण’ योजनेचा निधी लवकरच खात्यात जमा होणार!

माझी लाडकी बहीण’ योजनेचा निधी लवकरच खात्यात जमा होणार!

आदिती तटकरे यांची घोषणा, अजित पवारांचे स्पष्टीकरण; महिलांना दिलासा !

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

माझी लाडकी बहीण’ योजनेचा निधी लवकरच खात्यात जमा होणार!

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे! एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे. यामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून एप्रिल महिन्याचा हप्ता जमा न झाल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, आदिती तटकरे यांनी ट्विटरवरून माहिती देताना सांगितले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी आजपासून पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील २ ते ३ दिवसांत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा केला जाईल.”

या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा सरकारचा संकल्प अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, महिलांनी आपले बँक खाते आधारशी लिंक केले असल्याची खात्री करणे आवश्यक आहे, जेणेकरून निधी योग्य प्रकारे जमा होईल, असे आवाहनही त्यांनी केले.

आदिती तटकरे यांच्या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही योजनेच्या निधीविषयी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “लाडक्या बहिणीचं नियोजन केलं आहे आणि त्यानुसार निधी लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सगळ्या योजनांचे पैसे देण्याचा प्रयत्न केला जातोय.”

‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये सन्मान निधी दिला जातो. एप्रिल महिन्याचा हप्ता उशिरा जमा झाल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. मात्र, आता ही प्रक्रिया सुरू झाली असून काही दिवसांत सर्व लाभार्थींना पैसे मिळणार आहेत.

या घोषणेमुळे राज्यातील लाखो महिलांना दिलासा मिळाला असून, आता त्यांना त्यांच्या हक्काचा निधी लवकरच मिळणार आहे.

तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटते? कमेंटमध्ये नक्की कळवा!

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!