news
“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप“कोणत्याही आदेशाशिवाय महिलांकडून रात्री-बेरात्री करून घेतली जातेय साफसफाई!” विजयाताई साठे यांचा कंत्राटदारांवर गंभीर आरोप; दोषींना ‘ब्लॅकलिस्ट’ करून गुन्हे दाखल करण्याची मागणी“रुग्णवाहिका आणि औषधांचा तुटवडा दूर करा!” पदमपाणी मंगलम येथे रंगला आरोग्य जनसंवाद; तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता वानखडे यांच्याकडून अडचणी सोडवण्याचे आश्वासन“रुग्णवाहिकांना रस्ता मिळेना, पदपथांवर माफियांचा कब्जा!” वायसीएम आणि डी.वाय. पाटील रुग्णालय परिसरात अनधिकृत टपऱ्यांचा विळखा; राजकीय दबावामुळे कारवाई थंडावल्याचा ननावरे यांचा गंभीर आरोप“एका मातेचा सन्मान राखण्यासाठी राजगुरूंच्या आईने स्वतःच्या पुत्राची भेट नाकारली!” किरणजीत सिंग यांनी सांगितली लाहोरमधील ऐतिहासिक आठवण; शहीद पार्वतीबाईंच्या त्यागाला सलाम करण्यासाठीच पुणे दौरा
Home बारामती ‘दादां’ना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये उत्स्फूर्त बंद; आधुनिक शहराच्या शिल्पकाराच्या जाण्याने उद्योगनगरी पोरकी

‘दादां’ना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये उत्स्फूर्त बंद; आधुनिक शहराच्या शिल्पकाराच्या जाण्याने उद्योगनगरी पोरकी

प्रशासकीय इमारतींवरील ध्वज अर्ध्यावर; बारामती विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू, राजकीय मतभेद विसरून सर्वपक्षीय नेत्यांकडून हळहळ. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अश्रूंच्या महापुरात उद्योगनगरी; अजितदादांच्या निधनानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये कडकडीत बंद, जनजीवन ठप्प

(२८ जानेवारी २०२६ )


पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले

पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पिंपरी-चिंचवड शहराचे भाग्यविधाते अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाची बातमी धडकताच संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या नेतृत्वाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आज संपूर्ण शहरात उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात येत असून, उद्योगनगरीचे चाक आज पूर्णपणे थांबले आहे.

नागरी विमान वाहतूक विभागाने (DGCA) बारामती येथे झालेल्या या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या सहाही व्यक्तींची नावे जाहीर केली आहेत: १) अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) २) सुमित कपूर (मुख्य वैमानिक) ३) शांभवी पाठक (सह-वैमानिक) ४) विदीप जाधव (अंगरक्षक) ५) पिंकी माळी (केबिन क्रू) (टीप: विमानात एकूण ६ जणांचा मृत्यू झाला असून सहाव्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.)

पिंपरी-चिंचवड शहराच्या आधुनिक रूपाचे शिल्पकार म्हणून अजितदादांची ओळख होती. त्यांनी स्वतःच्या लेकराप्रमाणे या शहरावर प्रेम केले आणि आज त्यांच्या निधनानंतर शहरानेही कडकडीत बंद पाळून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पिंपरी कॅम्प, सिंधी कॅम्प, पिंपरी गाव, पिंपळे सौदागर, रहाटणी, वाकड आणि सांगवी या भागांत सकाळपासूनच व्यवहार पूर्णपणे ठप्प आहेत. पिंपरी मार्केट, चिंचवड स्टेशन आणि भोसरी यांसारख्या गजबजलेल्या भागांत आज स्मशानशांतता पाहायला मिळत आहे.

केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेच नव्हे, तर शहरातील शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि इतर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. “प्रशासनावर पकड असलेला आणि शब्दाचा पक्का नेता हरपला,” अशी भावना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली. ठिकठिकाणी कार्यकर्ते एकत्र जमून दादांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे कामकाज आज पूर्णपणे थंडावले आहे. प्रशासकीय इमारतीवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला असून, निधनाच्या बातमीने पालिका वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मौन पाळून आपल्या मार्गदर्शकाला आदरांजली वाहिली. अत्यावश्यक सेवा वगळता सार्वजनिक वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला असून रस्त्यांवर शुकशुकाट आहे.

आजची उद्योगनगरी आपल्या लाडक्या ‘दादां’च्या निधनाने खऱ्या अर्थाने पोरकी झाली आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!