news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पिंपरी चिंचवड “कष्टकऱ्यांचे पाठीराखे दादांना भावपूर्ण निरोप!” पिंपरी-चिंचवडमध्ये हजारो विक्रेत्यांचा स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद

“कष्टकऱ्यांचे पाठीराखे दादांना भावपूर्ण निरोप!” पिंपरी-चिंचवडमध्ये हजारो विक्रेत्यांचा स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद

फेरीवाला क्रांती महासंघाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; लाडक्या नेत्यासाठी हातावरचे पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांनी त्यागला एक दिवसाचा रोजगार. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

कष्टकऱ्यांचा आधारवड हरपला! पिंपरी-चिंचवडमधील हजारो हातगाडी व स्टॉल धारकांनी व्यवसाय बंद ठेवून अजितदादांना वाहिली श्रद्धांजली


पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, २९ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य कष्टकरी, हातगाडी आणि स्टॉल धारकांमध्ये अजितदादांबद्दल मोठी आपुलकी होती. याच भावनेतून महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पथविक्रेता समितीने दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील हजारो विक्रेत्यांनी आज आपला व्यवसाय स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “अजितदादा पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते कष्टकरी कामगार वर्गाचे खरे पाठीराखे होते. हॉकर्स झोन ही शहराची गरज असून राबणाऱ्या हातगाडी व स्टॉल धारकांचे योग्य पुनर्वसन व्हावे, ही त्यांची तळमळ होती. २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड शहरात स्वतः अजितदादांच्या हस्ते फेरीवाला प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले होते, हा क्षण कष्टकऱ्यांसाठी ऐतिहासिक होता.”

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या माध्यमातून वारंवार अजितदादांशी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाली होती. त्यांच्या जाण्याने कष्टकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या दुःखद घटनेचा निषेध आणि शोक व्यक्त करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह या आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील विक्रेत्यांनी आणि पदाधिकारी सभासदांनी आज दुकाने व गाड्या बंद ठेवल्या.

शहरातील मुख्य चौक, पदपथ आणि मंडई परिसरात जिथे दररोज हजारो हातगाड्यांची लगबग असायची, तिथे आज शुकशुकाट पाहायला मिळाला. हातावर पोट असणाऱ्या या वर्गाने केवळ दादांवरील प्रेमापोटी आपला एक दिवसाचा रोजगार सोडून त्यांना आदरांजली अर्पण केली. पिंपरी-चिंचवडच्या विकासात दादांनी दिलेल्या योगदानाबद्दल आणि फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर दाखवलेल्या संवेदनशीलतेबद्दल सर्व कष्टकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!