news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पिंपरी चिंचवड “दादा, तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थाने पोरकं केलंय!” राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्षांची अश्रूपूर्ण श्रद्धांजली

“दादा, तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थाने पोरकं केलंय!” राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्षांची अश्रूपूर्ण श्रद्धांजली

राजकीय वाटा वेगळ्या असूनही २५ वर्षांचे ऋणानुबंध कायम; "रवी, तू कुठे आहेस?" या दादांच्या हक्काच्या हाकेने रविकांत वर्पे भावूक. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

“आता फोनवर तो आवाज पुन्हा ऐकू येणार नाही…”; रविकांत वर्पे यांनी जागवल्या अजितदादांच्या ‘त्या’ आठवणी


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २९ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड : “नमस्कार, मी अजित पवार बोलतोय…” हा करारी पण आपुलकीचा आवाज आता पुन्हा कधीच ऐकू येणार नाही, या भावनेने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा ‘रवी’ म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे व्याकुळ झाले आहेत. राजकीय प्रवासात वाटा वेगळ्या झाल्या असल्या, तरी दादांशी असलेले २५ वर्षांचे ऋणानुबंध वर्पे यांनी अत्यंत भावूक शब्दांत व्यक्त केले आहेत.

“जेव्हा पक्ष फुटला, तेव्हा दादांचा मला फोन आला होता. ‘रवी, तू कुठे आहेस? माझ्यासोबत चल, वेडेपणा करू नकोस,’ असे त्यांनी हक्काने सांगितले होते. मी साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला, तरीही दादा आणि माझ्या नात्यात कधीच कटुता आली नाही. वयाच्या २५ व्या वर्षापासून मी त्यांचा मायेचा स्पर्श अनुभवला आहे,” अशा शब्दांत वर्पे यांनी दादांच्या मोठेपणाची साक्ष दिली.

रविकांत वर्पे यांनी दादांचे मीडिया समन्वयक म्हणून काम पाहिले होते, त्या काळातील आठवणींना त्यांनी उजाळा दिला:

  • मिनिट-टू-मिनिट नियोजन: दादांचे वेळापत्रक म्हणजे अचूकता. सकाळी ७ वाजता मुलाखत असेल, तर पत्रकारांनाही वेळेत यावेच लागायचे.

  • कामाची पद्धत: मंत्रालयातील काम सांभाळून ते एका दिवसात अनेक मुलाखती पूर्ण करायचे. त्यांनी कधी कामामुळे मुलाखत चुकवली नाही आणि मुलाखतीसाठी कामाकडे पाठ फिरवली नाही.

“गुरुवार म्हणजे दादांचा जनता दरबार! राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सामान्यांचे प्रश्न ते जागेवरच फोन करून सोडवायचे. त्यांच्याकडे दिलेले निवेदन कधीच हरवले नाही, त्यावर कारवाई व्हायचीच,” असे वर्पे यांनी नमूद केले. तसेच, कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बैठकीला जाताना दादा नेहमी पूर्ण अभ्यास करूनच जायचे, ही त्यांची कामाची पद्धत नव्या पिढीसाठी आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले.

अजितदादांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी व्यक्त करताना वर्पे म्हणतात:

“आता कुठल्याही नेत्याच्या सभांना तशा टाळ्या आणि शिट्ट्या होणार नाहीत. सभेत कुणी कार्यकर्त्यांची फिरकी घेणार नाही. स्टेजवर गॉगल घालून येणारे दादा आणि ‘एकच वादा, अजित दादा’ अशा गर्जना आता केवळ आठवणीत राहतील. दादा, तुम्ही आम्हा अनेक कार्यकर्त्यांना आज पोरकं केलंय.”

स्वच्छता, शिस्त, करारीपणा आणि कमालीची संवेदनशीलता असलेल्या एका महान नेतृत्वाला त्यांच्या लाडक्या ‘रवी’ने ही अश्रूपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!